kudrat (कुदरत)-Fakruddin Bennur Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
₹450.00 Original price was: ₹450.00.₹360.00Current price is: ₹360.00.
Author : Fakruddin Bennur
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 9788196035167
Publisher : Shabd Publication शब्द पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
kudrat (कुदरत)-Fakruddin Bennur Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
संकलकाचे निवेदन
२०१७ साली मुंबईमधील न्यूज चॅनेलचा कॉर्पोरेट जॉबचा राजीनामा देऊन पुण्यात परतलो आणि ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकाचं संपादनकार्य करू लागलो. मासिकाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सरांशी नव्याने संपर्क आला. तत्पूर्वी २०१० साली त्यांच्या लिखाणातून आणि एक-दोन व्यक्तिगत भेटींतून त्यांचा आणि माझा परिचय होऊन तो वृद्धिंगत झालेला होता. त्याच दरम्यान सोलापूर निवासी सरफराज अहमद यांच्याशी मैत्री झाली. त्यांनी बेन्नूर सरांशी माझी नव्याने ओळख करून दिली. माझं घर कोंढवा (खु) मध्ये होतं. अर्थात सरांच्या पारगे नगरमधील घरापासून अवघ्या पाच-सातशे मीटर अंतरावर मी राहत होतो. त्यामुळे आमच्या भेटीगाठी नियमित होऊ लागल्या. तत्पूर्वी त्यांचं लेखनकार्य एकत्रित करून ते पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याची कल्पना मी सरफराज भाईंकडे मांडली होती. त्यांनी ती सरांपर्यंत पोहोचवली होती. त्यांनी ती हातोहात घेतली व त्यांचं सर्व लेखन मला उपलब्ध करून दिलं.
महिना-दीड महिन्यात होईल तेवढं लेखन संकलित करून चार विषयांच्या फाइल्स शब्द पब्लिकेशनचे संचालक येशू पाटील यांना त्यांच्या डिसेंबरच्या पुणे भेटीत दिलं. त्यांनी सरांचं एकूण सर्व साहित्य प्रकाशित करण्याचं कबूल केलं. कारण सरांच्या लिखाणाशी पाटील परिचित होते. हा निरोप जेव्हा मी सरांना दिला, त्या वेळी त्यांना खूप आनंद झाला आणि समाधानही लाभलं. उत्साहाने त्यांनी बरंच अप्रकाशित-प्रकाशित लेखन उपलब्ध करून दिलं. त्याच वेळी सरांनी आत्मकथनाची हस्तलिखित पाने दिली. दरम्यान त्यांचं ‘हिंदवी स्वराज्य : एक अन्वयार्थ’ आणि ‘मुस्लीम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद’ पुनः प्रकाशित करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न सुरू झाले होते. सरांनी आपल्या आत्मकथनाची संपूर्ण हस्तलिखित प्रथम सरफराज भाई व नंतर माझ्याकडे सुपूर्द केली. मी त्वरित त्याच्या प्रकाशनपूर्व प्रक्रियेला सुरुवात केली. परंतु दुर्दैवाने प्रा. बेन्नूर यांचा किडनीचा आजार बळावला व पुढच्या सहा महिन्यांत १७ऑगस्ट २०१८ला त्यांचं दुर्दैवी निधन झालं.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.