Kshipra (क्षिप्रा)-Sharchchandra Muktibodh Marathi Book katha-kadambari (novel)
शरच्चंद्र मुक्तिबोध यांनी लिहिलेल्या तीन कादंबऱ्यांच्या मालिकेतील पहिल्या कादंबरीची ही नवी आवृत्ती.
कादंबरीचा नायक बिशू याच्या निरागस बालपणापासून त्याने तरुणपणी जाणीवपूर्वक एका निश्चित जीवनमार्गाचा स्वीकार करीपर्यंतचे विविधांगी दर्शन या कादंबरी-मालिकेत घडते. तसेच बिशूच्या भोवतालच्या व्यक्तींच्या जीवनातील घडामोडींचे व्यामिश्र चित्रणही त्या अनुषंगाने आले आहे.
स्वतःच्या लेखनप्रक्रियेविषयी मुक्तिबोध फारसे कधी बोलत किंवा लिहीत नसत. परंतु त्यांचे अशा प्रकारचे दोन महत्त्वाचे लेख या नव्या आवृत्त्यांमध्ये समाविष्ट केले आहेत. ‘माझ्या कादंबरीलेखनाची प्रेरणा’ हा त्यांचा लेख ‘क्षिप्रा’ला जोडला आहे, तर ‘मी आणि माझे लेखन’ हा ‘सरहद्द’ला. स्वतःच्या लेखनामागची मुक्तिबोधांची भूमिका समजून घेण्यास या लेखांचा उपयोग होईल.
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional )
Available at Ksagar Book Centre ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.