Krutitun Khagol Shikshan कृतीतून खगोल शिक्षण T. V. Venkateswaran, Anshumala Gupta

55.00

Author        :        T. V. Venkateswaran, Anshumala Gupta

Edition        :        2019

Language  ‏  :       Marathi

Publisher  ‎  :       The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Krutitun Khagol Shikshan कृतीतून खगोल शिक्षण

T. V. Venkateswaran, Anshumala Gupta

चंद्र-सूर-तारे आणि विश्वाच्या जडणघडणीचे आकर्षण नाही अशी व्यक्ती सापडणे कठीण, मग तो सान असो वा मोठा. आपले विश्व, त्यातले आपले स्थान काय याबद्दल याचा शोध आपण कैक शतके घेत आहोत रोज आकाशात तायऱ्यांचे विश्वम आणि प्रकाश व रंगांची उधळण बघताना त्यांनी जसे साहित्यिक-कवींना आकर्षित केले तसेच वैज्ञानिक संशोधक अभ्यासकांनाही भुरळ घातली.

अशा या अत्यंत जिव्हाळ्याच्या परंतु गुंतागुंतीच्या विषयाच्या अभ्यासाकडे बालमन आकृष्ट करायचे काम डॉ. टी. वी. व्यकंटेश्वरन आणि अंशुमाला गुप्ता यांनी या पुस्तकाद्वारे केले आहे. पृथ्वी, तिचा आस, तिची गती, चंद्र-सूर्य व पृथ्वी यांचे स्थान व कक्षा, आणि ही सगळी त्रिमितीय रचना अतिशय समजेल अशा ‘रोल प्ले’ अर्थात ‘नाटकाच्या’ माध्यमातून केले आहे. बालवयात नाटक करायला मुलांना खूप आवडते, किंबहुना ‘नाटक करणे’ म्हणजे एक प्रकारे त्यांचे शिकणेच असते, असे बालमानसशास्त्र सांगते. त्यामुळे या दोन्हीचा संगम इथे घालून सहजपणे मुलांना ही क्लिष्ट रचना समजेल अशाच कृती पानोपानी आपल्याला दिसतील. या कृती शिक्षकांनाही करायला आवडतात, कारण बरेचदा बालवयात पडलेले प्रश्न चुटकीसरशी सुटतात आणि हे विषय शिकवायचे कसे याचे ओझे कमी होते असाही अनुभव आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना मुलांबरोबर काम करायचे आहे, मग ते शिक्षक असोत, बालमंच वा खेळघरचे कार्यकर्ते असोत वा विज्ञान प्रसार करणारे सामाजिक कार्यकर्ते असोत सगळ्यांना हे पुस्तक उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो आणि सर्वजण याचे स्वागत करतील अशी आशा आहे.

Marathi Translated Novel  By Ashvini Ghotale

 

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.