

Kendra Pramukh Bharti Pariksha – Paper Dusra Dr. Shashikant Annadate
₹595.00 Original price was: ₹595.00.₹447.00Current price is: ₹447.00.
Kendra Pramukh Bharti Pariksha – Paper Dusra Dr. Shashikant Annadate
Author : Swati Shete And Dr. Shashikant Annadate
Edition : 3rd -2023
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Kendra Pramukh Bharti Pariksha – Paper Dusra Dr. Shashikant Annadate
ZP Kendrapramukh 2023
जिल्हा परिषद शिक्षकांना परीक्षेतील गुणवत्तेनुसार केंद्रप्रमुख होण्याची सुवर्णसंधी!
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदेत 2384 केंद्रप्रमुख पदे भरली जाणार आहेत, त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केंद्रप्रमुख रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली असून या पदांसाठी जिल्हा परिषद शिक्षकांना 15 जून 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.IBPS कंपनीकडून नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्यासाठी आपली गुणवत्ता सिध्द करावी लागणार आहे. IBPS परीक्षेचा पॅटर्न लक्षात घेता शिक्षकांना सखोल अभ्यास करून आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. प्राथमिक शिक्षकांना पदोन्नतीच्या संधी कमी असल्याने परीक्षेतून गुणवत्तेनुसार केंद्रप्रमुख होण्याची सुवर्णसंधी अनेक वर्षांच्या प्रतिक्षेतून शिक्षकांना उपलब्ध झाली आहे.
याबाबत माहिती अशी आहे की, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना 2384 रिक्त केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धापरीद्वारे नियुक्ती देण्यासाठी “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३” या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयात आयोजन करण्यात आले आहे.
अर्ज करण्याची मुदत ऑनलाईन प्रणालीव्दारे दि. 6 जून 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत अर्ज करता येतील.
केंद्रप्रमुख परीक्षा माहितीची लिंक www.mscepune.in
केंद्रप्रमुख अर्ज लिंक
https://ibpsonline.ibps.in/mscepapr23
परीक्षा शुल्क
1.सर्व संवर्गातील उमेदवार – 950 रुपये
2.दिव्यांग उमेदवार – 850 रुपये
केंद्रप्रमुख पदासाठी अर्हता
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची
बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवी
धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा
(शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. ”
केंद्रप्रमुख वेतनश्रेणी : 9300 – 34800 ग्रेड पे वेतन – 4400
केंद्र प्रमुख विभागीय परीक्षेच्या नवीन 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी
केंद्रप्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.
पेपर क्रमांक एकमध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
केंद्र प्रमुख परीक्षेच्या दोन्ही पेपरचे नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
पेपर क्रमांक एक – बुद्धिमत्ता व अभियोग्यता
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ
1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक व शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक – डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (दुसरी आवृत्ती)
2. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी – के सागर (चौथी आवृत्ती)
3.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र – डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)
4. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी – स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)
5.शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका – डॉ.शशिकांत अन्नदाते
पेपर – 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह
1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी – 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी – 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध – 15 गुण
4 अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी – 15 गुण
5 माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी – 20 गुण
6 वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7 संप्रेषण कौशल्य – 15 गुण
एकूण – 100 गुण
केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ
१.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के’सागर पब्लिकेशन्स, पुणे (तिसरी आवृत्ती)
सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.
तसेच केंद्र प्रमुख परीक्षा पेपर दोनच्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
1.केंद्रप्रमुख पेपर 2 व शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षणशास्त्र तांत्रिक ज्ञान घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्न – स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स
2.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)
3.संपुर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संपुर्ण विवेचन व वस्तुनिष्ठ प्रश्न – डॉ.शशिकांत अन्नदाते(नववी आवृत्ती)
5 .शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह- डॉ.ह.ना.जगताप
6.शिक्षणातील नवविचारप्रवाह – डॉ.नीलिमा सप्रे, फडके प्रकाशन
7.शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
Best of Luck
(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Publication House |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.