

Haravalelya Goshtiche Rahasya Sudha Murty
₹240.00 Original price was: ₹240.00.₹204.00Current price is: ₹204.00.
Author : Sudha Murty
Edition : 2023
Language : Marathi
Publisher : Mehta Publishing House
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Haravalelya Goshtiche Rahasya हरवलेल्या गोष्टीचे रहस्य
सुधा मूर्ती
अनुवाद : लीना सोहोनी
अनुष्का सुमारे वर्षभर लॉकडाउनमध्ये राहिलेली आहे. आता ती चौदा वर्षांची झालेली आहे आणि ती सोमनहळ्ळीमध्ये राहणाऱ्या आपल्या आजी-आजोबांच्या भेटीला निघालेली आहे. गेल्या खेपेला आपल्या आजी-आजोबांना भेटायला गेल्यावर तिनं एक पुरातन अशी पायऱ्यांची विहीर शोधून काढली होती. या तिच्या साहसी कृत्याच्या आठवणी-‘हरवलेल्या मंदिराचे रहस्य’ या पुस्तकामधून अजूनही तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात ताज्या आहेत.
अखेर एकदा आपल्या घराच्या चार भिंतींमधून बाहेर पडायला मिळाल्यामुळे अनुष्का अत्यंत खूश आहे; पण लवकरच ती आणखी एक रहस्य शोधून काढणार आहे, हे तिला कुठे माहीत आहे? फक्त या खेपेला तिच्या जन्मजात चौकस स्वभावामुळे ती तिच्या स्वतःच्या घराण्याच्या इतिहासातील एक हरवलेला दुवा शोधून काढणार आहे.
सुधा मूर्तीनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीमध्ये लिहिलेल्या ‘हरवलेल्या गोष्टीचे रहस्य’ या पुस्तकातून प्रश्न विचारण्याचं आणित्यांची समर्पक उत्तरं मिळवण्याचं महत्त्व स्पष्ट करून सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशा चित्रांनी आणि थक्क करणाऱ्या दृश्यांनी नटलेल्या या पुस्तकातून भारतातील सुप्रसिद्ध कथालेखिका सुधा मूर्ती आपल्याला विशाल अशा तुंगभद्रा नदीच्या काठाकाठानं एका अविस्मरणीय प्रवासाला घेऊन जातात.
Marathi Novel By Sudha Murty
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.