Grampanchayat Adhikari (Gramsevak Bharti Pariksha) (ग्रामपंचायत अधिकार)-V.N. Swami
विद्याभारती ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) संपूर्ण मार्गदर्शक हे
पुस्तक आपल्या हाती देताना आम्हांस अतिशय आनंद होत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या कार्यालयात ग्रामसेवक या पदाच्या हजारो जागा आगामी काळात भरण्यात येणार आहेत.
या पुस्तकातून सर्वसाधारण माहिती: महाराष्ट्रातील जिल्हे, महाराष्ट्र,
भारत, सामान्य ज्ञान ग्रामीण प्रशासन, मराठी भाषेचे ज्ञान, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, कृषि व चालू घडामोडी इत्यादी अकरा विभागांतून २०० गुणांची लेखी परीक्षेची तयारी होईल. अशा प्रकारे १००% गुणांच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेली माहिती पुस्तकात अद्ययावत, मुद्देसूद व विस्ताराने दिली आहे.
विद्याभारती प्रकाशनचे उत्साही प्रकाशक श्री. रवि जोशी यांनी अल्पावधितच आपल्यापर्यंत हे पुस्तक पोहोचविल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
पुस्तकातील उणीवासंबंधी व पुस्तकाची उपयुक्तता वाढविण्यासाठी आपल्या सूचना व अभिप्राय स्वागतार्ह आहेत. आपल्या सूचनांचा पुढील आवृत्तीत अवश्य विचार केला जाईल.
ग्रामसेवक भरती परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवारास हार्दिक शुभेच्छा !
आपले विनीत, व्ही.एन. स्वामी
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.