

Ghost Writer Aani Itar Vidnyankatha (घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा)-Ashish Mahabal Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Author : Ashish Mahabal
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 26736
Publisher : Samakaleen Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Ghost Writer Aani Itar Vidnyankatha (घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा)-Ashish Mahabal Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
प्रस्तावना
▶ आशिष महाबळ हा विज्ञानकथा लेखक आहे, पण आधी तो विज्ञान संशोधक आहे. कॅलटेक या जगद्विख्यात संस्थेत खगोल आणि खवास्तवशास्त्र (अॅस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रोफिजिक्स) या विषयांचा पूर्णवेळ वैज्ञानिक आहे. त्याचं नाव जागतिक खगोलशास्त्र परिषदेने (इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन) एका लघुग्रहाला दिलं आहे. याशिवाय तो आंतरराष्ट्रीय भटक्या आहे. अनेक खंडांमधील प्रकाश प्रक्षण नसलेल्या पर्वतशिखरावरील टेलिस्कोपमधून अवकाश निरीक्षणासाठीही तो जात असतो. तिथल्या स्थानिक जमातींतील मुलांनाही त्याने खगोलशास्त्राचे धडे दिलेले आहेत. हे सगळं सांगण्याचं कारण असं, की कितीही नाही म्हटलं तरी लेखकाच्या साहित्यात कुठे ना कुठे त्याच्या आयुष्याचं प्रतिबिंब पडत असतं. आशिषच्या कथाही याला अपवाद नाहीत. त्याच्या कथा हार्ड कोअर सायफाय (सायन्स फिक्शन) आहेत.
आशिषच्या कथांबद्दल लिहिण्याआधी गैरसमज टाळण्यासाठी विज्ञानसाहित्य म्हणजे काय हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. साहित्याची ही शाखा मुळात पाश्चात्त्य देशांमधली. युरोपमध्ये ती जन्माला आली, रुजली. पुढे ती अमेरिकेत फोफावली. पूर्वी या साहित्यप्रकारास ‘सायंटिफिक्शन’ म्हटलं जात असे. पहिल्या महायुद्धानंतर या साहित्यप्रकाराला ‘सायन्स फिक्शन’ म्हटलं जाऊ लागलं, तर अलीकडच्या काही दशकांत साधारणपणे १९९०नंतर या साहित्य शाखेस अमेरिकेत ‘स्पेक्युलेटिव्ह’ फिक्शन म्हणण्यात येऊ लागलं. याचं कारण विज्ञानसाहित्य हे नेहमीच अजून अस्तित्वात न आलेल्या म्हणजे भविष्यकाळाचा विचार करत असतं.
सर्वसाधारणपणे विज्ञानसाहित्याची लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत :
१. विज्ञानसाहित्यातील घटना या भविष्यकाळात घडतात. (याला एकमेव अपवाद म्हणजे कालप्रवास करून भूतकाळात डोकावणाऱ्या कथा-कादंबऱ्या.)
२. विज्ञानकथा जेव्हा लिहिली जाते तेव्हा त्या काळापर्यंत प्रचलित असलेलं विज्ञान गृहीत धरावं लागतं. या विज्ञान नियमांत बदल करायचा झाल्यास त्यासाठी त्या विज्ञान साहित्यिकाला तर्कशुद्ध कारण द्यावं लागतं.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.