Indian society (sociology) For UPSC And State Civil Services Examinations M.Senthil Kumar,S.Rijesh
Indian society (sociology) For UPSC And State Civil Services Examinations M.Senthil Kumar,S.Rijesh Original price was: ₹360.00.Current price is: ₹306.00.
Back to products
Indian Economy Vivek Singh 2025
Indian Economy Vivek Singh 2025 Original price was: ₹699.00.Current price is: ₹559.00.

Geography Through Maps World (Marathi Bhugol) K Sidharth,S.Mukharji anuvad (Shreekanth gokhale)

Original price was: ₹350.00.Current price is: ₹245.00.

Author        : K Sidharth,S.Mukharji (anuvad Shreekanth gokhale)

Edition        :2 ed

Language  ‏  : Marathi

Publisher  ‎  :  K’sagar Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

In stock

Description

Geography Through Maps World (Marathi) K Sidharth,S.Mukharji anuvad (Shreekanth gokhale)

K सागरीय

आदरणीय के. सिद्धार्थ, केंद्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातील एक नावाजलेलं व आदरणीय व्यक्तिमत्त्व, राष्ट्रीय ख्यातीचे भूगोल विषयाचे प्राध्यापक आणि भूगोलतज्ज्ञ, भूगोल विषयाच्या अध्यापनाशी आणि संशोधनाशी त्यांनी आयुष्यभर बांधिलकी पत्करलेली अन् जपलेली. भूगोलासारखा रूक्ष विषय सोपा करून सांगण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय. विषयाचे अचूक मूल्यमापन व विश्लेषण करण्याची त्यांची क्षमता विलक्षण, के. सिद्धार्थ सरांनी एस. मुखर्जी या त्यांच्या व्यासंगी सहकाऱ्याच्या सहकार्याने लिहिलेले जिऑग्रफी थ्रू मॅप्स हे पुस्तक मराठीत आणण्याची मागणी माझ्या विद्यार्थी मित्रांकडून गेली कित्येक वर्षे सातत्याने केली जात होती.

केंद्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षेसाठी तद्वतच राज्य लोकसेवा आयोगाच्याही दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त सिद्ध झालेल्या या ग्रंघातील ज्ञानामृत महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मायबोलीच्या पदराखाली चाखता यावं हे माझेही स्वप्न होते. गरज होती ती या ग्रंथास पुरेपूर न्याय देऊन मराठीत अनुवादित करू शकणाऱ्या ओघवत्या अन् प्रवाही लेखणीची.

माझे शालेय मित्र श्रीकांत गोखले यांच्या रूपाने ही लेखणी मला गवसली आणि आता आपण या ग्रंथास पुरेपूर न्याय देऊ शकू याची खात्री पटली.

जिऑग्रफी थ्रू मॅप्स या मूळ ग्रंथात भारताच्या तद्वतच जगाच्याही भूगोलाचा नकाशांच्या साहाय्याने आणि नकाशांच्या माध्यमातून परामर्श घेतलेला आहे. मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत आणताना राज्य व केंद्र या दोन्ही लोकसेवा आयोगांच्या अभ्यासक्रमांचा एकत्रित विचार करता हा ग्रंथ जिऑग्रफी थ्रू मॅप्स इंडिया व जिऑग्रफी भ्रू मॅप्स : वर्ल्ड अशा दोन स्वतंत्र ग्रंथांच्या माध्यमातून मराठीत आणणे अधिक इष्ट व सयुक्तिक होय, अशी माझी धारणा होती व आहे. या धारणेतून जिऑग्रफी छू मॅप्स : इंडिया या पहिल्या खंडापाठोपाठ आज जिऑग्रफी थ्रू मॅप्स : वर्ल्ड हा दुसरा खंड महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या हाती सोपविताना कृतकृत्यतेचा यथार्थ आनंद होत आहे.

के. सिद्धार्थ सरांनी आणि किसलया पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी हा ग्रंथ मराठीत आणण्यास अनुमती दिल्याबद्दल त्यांचा आणि हा ग्रंथ अथक परिश्रम घेऊन ओघवत्या शैलीत मराठीत अनुवादित केल्याबद्दल श्रीकांत गोखले यांचा मी निरतिशय ऋणी आहे.

मूळ ग्रंथाचे मराठी रूप साकारताना सोयीच्या दृष्टीने प्रस्तुतच्या पुस्तकाची रचना विभाग पहिला : जगाची ओळख, विभाग दुसरा : उत्तर अमेरिका, विभाग तिसरा : दक्षिण अमेरिका, विभाग चौघा आफ्रिका, विभाग पाचवा : युरोप, विभाग सहावा : ऑस्ट्रेलिया व प्रशांत महासागरीय बेटे, विभाग सातवा : अंटार्क्टिका खंड, विभाग आठवा आशिया, विभाग नववा विषयनिहाय तक्ते, नकाशे व आलेख अशा नऊ विभागांत व एकूण २८ प्रकरणांत केली असून पुस्तकातील महत्त्वाच्या ओळी स्क्रिनचा वापर करून लक्षवेधी बनविलेल्या आहेत. पुस्तकाची ही रचना विद्यार्थी मित्रांना निश्चितच भावेल, अशी खात्री आहे.

साधी-सोपी के’सागरीय भाषाशैली, सुबोध रचनाशैली आणि परिपूर्णता व उपयुक्तता यांच्याशी इमान राखणारा हा ग्रंथ माझ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या परीक्षेत सुयश मिळवून देण्यास निश्चितच उपयुक्त सिद्ध होईल, याची खात्री वाटते.

आपल्या खात्रीदायक यशाबद्दल शुभेच्छांसह !!

आपला,

व्ही. एस. क्षीरसागर

(K’Sagar)

Best Political Science Book For MPSC, UPSC Mains

Available at Ksagar Book Centre or on

 

Additional information
Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.