

Garden Of Edan Urf Sai Society (गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी)-Makarand Sathe Marathi Book katha-kadambari (Novel)
₹350.00 Original price was: ₹350.00.₹300.00Current price is: ₹300.00.
Author : Makarand Sathe
Edition : 3 ed
Language : Marathi
ISBN : 9788179919644
Publisher : Popular Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Garden Of Edan Urf Sai Society (गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी)-Makarand Sathe Marathi Book katha-kadambari (Novel)
गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी
मकरंद साठे
कादंबरीत साठेचा तृतीय पुरुषी निवेदक जे विदारक वास्तव रेखाटतो तो आपला चालू वर्तमानकाळ. आपलं समकालीन वाळवंट. ज्यात अनेक काळ बध्यड गोळ्यांसारखे एकमेकांवर कर्कश्श्पणे आदळत बधिरपणा आणतात. ज्यात विकासापोटी रुंदावणाऱ्या आर्थिक दऱ्या समाजाचे समाजपणच भंगवून टाकतात. ज्यात व्यक्तीच्या विखंडित अस्मितांचे सैरभैर तुकडे कधी हिंसक झुंडीचे तर कधी व्याकूळ करणाऱ्या एकुटवाणेपणाचे रूप घेतात. जिथे वास्तवापासून तुटलेले वर्धित वास्तव (Augmented Reality) सार्वभौम होत जाते. अशा सुपीक वाळवंटात जातीवादाचे-धर्मांधतेचे एकाधिकारशाहीचे जालीम विष हरघडी पाझरत, मुरत, धगधगत राहते. त्यातून दररोज हिंसेची अधिकाधिक क्रूर रूपे साकार होत राहतात. ह्या सुन्न करणाऱ्या वाळवंटातील चमचमते मृगजळ म्हणजे ‘गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी’; जिच्या सुनसान आवारात ह्या कादंबरीतील अगदी विभिन्न सामाजिक-आर्थिक स्तरांतून येणारी काही प्रमुख पात्रे योगायोगाने एकमेकांना सामोरी जातात.
ह्या उत्तर-आधुनिक वाळवंटाला भिडताना जर व्यामिश्रतेची वा अभिनिवेशाची ढाल पुढे न करता भूमिका घेण्याची जोखीम पत्करायची असेल तर पुन्हा एकवार ‘आधुनिकतेला’ पर्याय नाही, असे साठे सुचवतात. मात्र इथे साठ्यांना आधुनिकतेचा रूढार्थ अभिप्रेत नाही. त्यांना जी अभिप्रेत आहे ती उत्तर-आधुनिकतेनंतरची आधुनिकता. ती आपल्या समोरच्या निर्णायक प्रश्नांना स्थल-कालसापेक्षतेच्या बचावात्मक मापदंडांपलीकडे नेत सार्वत्रिकतेला भिडवू पाहते. सॉक्रेटिसप्रमाणे निरपेक्ष सत्याचा आग्रह धरते. ती मानवी जीवनाच्या सामाजिक-ऐतिहासिक-भौतिक पातळ्या कवेत घेत त्या पल्याडच्या ‘असण्याला’ स्पर्श करू पाहते. मात्र हे करताना ‘असण्याच्या’ मुळाशी असलेल्या असंगताच्या, अनिश्चिततेच्या, अटळ मृत्यूच्या बौद्धदर्शनाने ती कोलमडून जात नाही. ‘असण्याच्या’ मूलभूत वैयर्थतेचा आत्मसन्मानाने स्वीकार आणि या धीरोदात्त स्वीकारासहित स्वातंत्र्य-समता-बंधुता ह्या चिरंतन मूल्यत्रयीवर आधारित सामूहिक मानवी मुक्तीसाठीचा आर्ष, असीम प्रयास म्हणजे ‘आधुनिकता’, अशी मांडणी ही कादंबरी सुचवते. ह्या सिसिफियन (Sisyphean) प्रयासाला गूढवादी आत्मिकतेच्या निर्वात पोकळीतून खेचून बाहेर काढत भौतिकतेला भिडवणे हे या कादंबरीचे मोठे यश. आणि हा व्यामिश्र वैचारिक पट इथे एखाद्या वाचनीय रहस्यकथेप्रमाणे उलगडतो ही ह्या कादंबरीची खरी ताकद.
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.