Firaste (फिरस्ते)-Abhishek Kumbhar Marathi Book katha-kadambari (Novel)
मनोगत
पुस्तकाचं लिखाण करणं ही काही फार धैर्याची किंवा शौर्याची गोष्ट नाही. मोक्कार गाजरं विकायची सवय असल्यावर तुम्ही तुमच्या शब्दातून कधीकधी मूळ देखील विकृ शकता, असा हा प्रकार पण तुमचं मनोगत लिहिण्याची वेळ आली की मग मात्र आपलं कसब पणाला लागतं, असंच म्हणावं लागेल.
नियोजन ठरतं काय, आम्ही लडाखला जातो काय इथपर्यंत सगळं ठीक होतं ओ, पण मित्रांनी अक्षरशः शिव्या देऊन माझ्याकडून या विषयावर पुस्तक लिहून घेणं हे म्हणजे जरा अतिच म्हणावं लागेल. पुस्तकवाचनाची आवड आणि थोडेफार एकमेकांना शब्द चिटकवण्याच्या कामात कधीतरी काहीतरी चांगलं समोर येतं. मित्र उगाचच कौतुक करतात की काय, असं सारखं वाटत राहायचं, पण नंतर बऱ्याच जणांनी लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं अन् त्याचीच फलनिष्पत्ती म्हणजे आज तुमच्या हातात असलेला ‘फिरस्ते’ हा शब्दप्रपंच होय.
पुस्तक लिहिताना एवढी मजा येत होती, की सगळ्या गोष्टींतून वेळ काढत जेव्हा पुस्तकाच्या लिखाणाला बसणं व्हायचं, तेव्हा पुन्हा त्याच दुनियेत हरविल्याचा भास व्हायचा. डोंगर-दऱ्या, जवान, ठिकाणं सगळं असं डोळ्यासमोरून जात असल्याचा तो आभास होता. लेखन पूर्ण झाल्यावर जेव्हा पुस्तक स्वतः वाचून पाहिलं तेव्हा स्वतःवर भलताच खूष होऊन बसलो होतो. एकंदरीत जमतंयच म्हटलं प्रकरण, म्हणून आता ते आपल्या हाती वाचण्यासाठी सिद्ध केलं.
हाणामारी, दुनियादारी, बेफिकिरी, कधी येडेचाळे करत तर कधी हुशारीने एकमेकांची काळजी घेत पूर्ण केलेल्या प्रवासाचं वर्णन सगळ्यांना नक्कीच आवडेल. पुस्तकस्वरूपात वाचकाला सामोरं जाण्याची ही पहिलीच वेळ, त्यामुळे काही डावं-उजवं, पुढे-मागे, अंदर-बाहर, वर-खाली जे काही असेल ते सांभाळून घ्याल, ही अपेक्षा.
अभिषेक सुनील कुंभार
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.