

Nitishastra, Sachoti Ani Naisargik Kshamata Unique Academy | Ethics Integrity and Aptitude
₹450.00 Original price was: ₹450.00.₹315.00Current price is: ₹315.00.
Author : Aparna Dixit/ Shuruth Rvish
Edition : 5th ( 2025 )
Language : Marathi
Publisher: : Unique Academy Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Nitishastra, Sachoti Ani Naisargik Kshamata Unique Academy | Ethics Integrity and Aptitude / नीतीशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता
नीतिशास्त्राच्या संकल्पनांनी मानवी आयुष्यातील जागा काळाच्या वेगवेगळ्या संदर्भात व्यापलेली दिसून येते. सामाजिक संकेत, नीतीनियम, बरोबर चूक या सगळ्यांमागील धारणा आणि त्यातून प्रत्यक्षात घडत असणारे समाजजीवन या गुंतागुंतीच्या संदर्भात नीतिशास्त्राचा अभ्यास कायमच पथदर्शी आणि गरजेचा राहिला आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाचा कधी ना कधी तरी नीतीशास्त्राशी संबंध आला आहे. याच पार्श्वभूमीवर विचार केला असता, असे लक्षात येते की, प्रशासन हेही आधुनिक मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे. आणि म्हणूनच प्रशासनातील नैतिकता व प्रशासनासाठी आवश्यक नीतीशास्त्रातील आधारभूत संकल्पना यांचा अभ्यास होणे विशेष महत्त्वाचे ठरते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) प्रशासनातील विविध पातळ्यांवरच्या सुधारणांचा भाग म्हणून यूपीएससी परीक्षेच्या संरचनेतदेखील बदल घडवून आणले. यातील एक अत्यंत स्वागतार्ह बदल म्हणजे, २०१३ पासून अंतर्भूत करण्यात आलेला नीतीशास्त्राचा (Ethics) घटक होय. मुख्य परीक्षेमध्ये सामान्य अध्ययनाचा एक पेपर (GS-IV) म्हणून याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेदेखील (MPSC) मुख्य परीक्षेच्या संरचनेमध्ये असाच बदल घडवत, नीतिशास्त्र (Ethics) या घटकाचा एक स्वतंत्र अध्ययनाचा पेपर (GS-IV) म्हणून अंतर्भाव केला आहे. हा बदल २०२५ च्या परीक्षेपासून लागू करण्यात आला आहे. या बदलांमुळे आता नीतिशास्त्र तसेच सामाजिक मानसशास्त्र आणि लोक प्रशासनातील नैतिकता या विषयांचे महत्त्व लक्षात येते.
यूपीएससीने दिलेल्या अभ्यासक्रमाशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहात या पुस्तकातल्या घटकांची आणि उपघटकांची काळजीपूर्वक निवड केलेली आहे. अर्थात, आपल्यासारख्या नीतीनियमांचे अवमूल्यन होत असणाऱ्या समाजामध्ये नीतिशास्त्राच्या या पेपरचे प्रयोजन अधिक ठळकपणे जरी लक्षात येत असले, तरीदेखील या पेपरच्या निमित्ताने खरेच कोणते बदल प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये घडून येतील काय? अशी साशंकता कायमच आजूबाजूला पाहायला मिळते. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकाच्या निमित्ताने वाचकाला आणि उमेदवारांना मिळतील ही अपेक्षा आहे.
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.