Engraji Vyakaran Sachin Jadhavar Vishwavidya इंग्रजी व्याकरण
₹510.00 Original price was: ₹510.00.₹357.00Current price is: ₹357.00.
Author : Sachin Jadhavar
Edition : 8 th -2024
ISBN : 9788194938330
Language : English & Marathi
Publisher: : Vishwavidya Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Engraji Vyakaran Sachin Jadhavar Vishwavidya इंग्रजी व्याकरण
हे पुस्तक का लिहिले?
सर. मी स्पर्धा परीक्षेची
माला तयारी करतोय. बाकीच्या विषयाचे काही वाटत नाही पण इंघजीची भीती वाटते… इंधजीमुळे स्कोर कमी येतो. काय करू?”
‘सर, Combine च्या दोन मुख्य परीक्षा दिल्या. इंग्रजीत आणखी 4-5 मार्क्स असते तर पोस्ट मिळाली असती. काय करू?
‘सर, माझ्याकडे दोन इंग्रजीची पुस्तके आहेत त्यांचा वारंवार अभ्यास करून सुद्धा इंग्रजोत कमी मार्क्स मिळतात. काय करू?”
आपल्या You Tube चॅनल च्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना मी इंग्रजी शिकवत होतो पण यावर पुस्तक लिहण्याचा काही विचार नव्हता, कारण बाजारात सध्या इंग्रजी व्याकरण या विषयावर भरपूर पुस्तके आहेत. मग अजून यात आपण नवीन पुस्तकाचो भर कशाला घालायची? हा विचार वारंवार मनात यायचा. पण जेव्हा वरील प्रश्न मला वारंवार विचारले गेले तेव्हा जाणवले की सध्या उपलब्ध असणाऱ्या इंग्रजीच्या पुस्तकांमध्ये काहीतरी कमतरता आहे. काहीतरी उणीव या पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळेच या पुस्तकांचा अभ्यास करून सुद्धा विद्यार्थाना इंग्रजी अवघड वाटतेय. मग ठरवले ती उणीव शोधून आपण ती उणीव भरून काढायची. तुम्हाला या पुस्तकाचा अभ्यास करताना नक्कीच जाणवेल की हे पुस्तक बाकीच्या पुस्तकांपेक्षा नक्कीच वेगळे आहे. आज या पुस्तकाची पाचवी आवृत्तो प्रकाशित झाली आहे. दोन वर्षात आठ हजार पेक्षा जास्त विद्याथ्यांनी या पुस्तकाचा अभ्यास केला आहे आणि प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यावरून आपण हे नक्कीच सांगू शकतो की हे पुस्तक विद्यार्थ्यांची इंग्रजीची भीती पळवून लावण्यात तसेच इंग्रजो पक्के करून घेण्यात यशस्वी झालेले आहे.
या पुस्तकातून आपल्याला वेगळे असे काय मिळणार आहे?
मित्रांनो, या पुस्तकातून तुम्हाला मिळणार आहे… इंग्रजीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन
एक नवी उमेद
एक नवा उत्साह
एक नवा आत्मविश्वास
आणि सर्वात महत्वाचे
तुमची इंग्रजीची भीती पळून जाणार आहे
हजारो विद्यार्थ्यांनी मला त्यांच्या ज्या अडवर्ण सांगितल्या त्या हजारो अडचणीचा विचार करून प पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक आणखीनच परीणामकारक आणि उपयुक्त झालेले आहे. ‘अशक्य काहीच नाही’
मित्रांनो एक गोष्ट कधीच विसरू नका आप मानवप्राणी आहोत आपल्याला आपल्या निमीत्यान बेल, घोडा इ. प्राण्याशिवाय गाडी चालूच शकत नाहीं असिमित बुद्धी दिली आहे. 200 वषांपूर्वी लोकांना वाटायचे इंजिनचा शोध लागला आणि लोकांना बिना बैलाची गति चालते हे कळाले…. अनेक अशक्य गोष्टी मानवाने आपल्या बुद्धी आणि प्रयत्नाच्या जोरावर शक्य केल्या आहेत.
आकाशात उडणे.. विमान
लाखो मेलावरील लोकांशी सेकंदात संपर्क करणे. मोबाईल.
एका व्यक्तीचा अवयव काढून दुस-याला बसवणे..
आपल्याला काही विशेष करायचे आहे का? नाही
आपल्याला काही शोध लावायचा आहे का? नाही नवीन काही निर्माण करायचे आहे का?… नाही
आपल्याला फक्त एक छोटेसे काम करायचे आहे…. इंग्रजी नावाच्या एका भाषेवर प्रभुत्व मिळवायचे आहे. जशी आपण मराठी शिकलो, हिंदी शिकलो… इंग्रजी पण शिकणारच… तुम्हाला जेव्हा जेव्हा असे वाटेल की तुम्ही इंग्रजी शिकू शकत नाही, तेव्हा हे नेहमी आठवा की तुमच्याकडे जर इंग्रजी शिकण्याची कुवत नसती तर आज तुम्ही मराठीही शिकू शकला नसता… ज्या अर्थी तुम्ही मराठी शिकू शकता त्या अर्थी तुम्ही इंग्रजीही निश्चित शिकू शकता.
जोपर्यंत तुम्ही या पृथ्वीतलावर आहात तोपर्यंत हे कधीही विसरायचे नाही.
‘असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे ।।’
.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
| Language | , |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.