Ekalavya Shambuk Aani Zalakaribai-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (एकलव्य शंबूक आणि झलकारीबाई)

60.00

Author           : A. H. Salunkhe 

Edition          : 1 ed 2023

Language    ‏  : Marathi

ISBN               : 9789384091002

Publisher      : Lokayat Prakashan लोकायत प्रकाशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Ekalavya Shambuk Aani Zalakaribai-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (एकलव्य शंबूक आणि झलकारीबाई)

मनोगत

आपल्या समाजाच्या इतिहासातील तीन प्रेरणादायक व्यक्तींविषयीचे हे लेखन आपल्या हाती देताना मला एक प्रकारचे समाधान वाटत आहे. हे लेखन केल्यामुळे त्यांच्या ऋणातून मुक्त झालो, अशी भावना माझ्या मनात मुळीच नाही. परंतु त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकलो, याची धन्यता नक्कीच आहे. या तीन व्यक्तींपैकी पहिल्या दोघांविषयी बहुतेकांनी खूप काही ऐकलेले, वाचलेले, लिहिलेले असते. मग माझ्या लेखनात नवीन काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यांची चरित्रे संदभांसह, साधार नोंदवण्याचा प्रयत्न या लेखनात आहे, इतकेच याबाबतीत मी म्हणू शकतो. वीरांगना झलकारीबाईंविषयी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात माहिती नाही, म्हणून येथे ती जाणीवपूर्वक नोंदविली आहे.

यापूर्वी मी एकलव्याविषयी ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ या माझ्या पुस्तकात थोडेबहुत लेखन केले होते. शंबूकाविषयी मात्र विस्ताराने लिहिले होते. किंबहुना, माझा पहिला गंभीर लेख शंबूकाविषयीच होता आणि तो सातारा जिल्ह्यातील वाई येथून प्राज्ञपाठशाळेद्वारा प्रकाशित होणाऱ्या ‘नवभारत’ या मासिकात ऑगस्ट १९७४ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्याच लेखाची नव्या स्वरूपात मांडणी करून तो येथे समाविष्ट केला आहे. झलकारीबाईंविषयी मात्र मी यापूर्वी काही लिहिले नव्हते. येथे पहिल्यांदाच लिहिले आहे. या तीन व्यक्तींची चरित्रे ही एकेकट्या तीन व्यक्तींची चरित्रे नसून आपल्या समाजातील वंचित-उपेक्षित जनसमूहांची प्रातिनिधिक जीवनदर्शने आहेत, असे मला वाटते.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एकलव्य आणि झलकारीबाई यांच्या पुतळ्यांची छायाचित्रे देण्यात आली आहेत. शंबूकाच्या बाबतीत मात्र असे काही उपलब्ध होऊ शकले नाही. कोणाकडे या संदर्भात अधिक माहिती असल्यास त्यांनी ती जरूर कळवावी, अशी नम्र विनंती आहे. महान व्यक्तींची स्मारके विविध प्रकारे प्रेरणाकेंद्रांच्या स्वरूपात व्हावीत, केवळ पुतळ्यांच्या स्वरूपात नव्हे,

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.