Duyyam Seva Vibhagiya Pariksha Gram Mahasul Adhikari (दुय्यम सेवा विभागीय परीक्षा)-Sanjay Kundetkar
पुस्तक परिचयः
ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या दुय्यम सेवा विभागीय परीक्षेसाठी मार्गदर्शदनपर असे कोणतेही पुस्तक उपलब्ध नाही. त्यामुळे असे एक सर्वसमावेशक पुस्तक लिहिण्याचा मानस होता.
त्यासाठी दुय्यम सेवा विभागीय परीक्षेची मागील काही वर्षांची प्रश्न पत्रिका मागवली. विविध प्रश्न पत्रिकांचे वाचन करतांना, त्यात अनेक प्रश्न दुबार असल्याचे आढळून आले. कदाचित प्रश्न पत्रिका तयार करणाऱ्यांनाही नवीन प्रश्ने सापडत नसतील.
महसूल कायद्यांचा आणि अभ्यासाचा आवाका खूप मोठा आहे. त्यामुळे सर्वच प्रश्नोत्तरे ‘दुय्यम सेवा विभागीय परीक्षा (ग्राम महसूल अधिकारी संवर्ग)’ या पुस्तकात समाविष्ठ करणे शक्य नाही, तरीही वारंवार विचारली गेलेली आणि महत्वाची अशी प्रश्नोत्तरे या पुस्तकात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
या पुस्तकात, प्रश्नोत्तरांचे तीन भाग करून, पहिल्या भागात १११ बहुपर्यायी प्रश्न, अचूक पर्यायांच्या कायदेशीर तरतुदींसह उपलब्ध करून दिली आहेत, दुसऱ्या भागात ४५ सविस्तर प्रश्ने तर तिसऱ्या भागात ८५ टिपा कायदेशीर तरतुदींसह उपलब्ध करून दिल्या आहेत.
शेवटी, अपिलीय अधिकाऱ्यांबाबतची माहिती, अपील- पुनरीक्षण -पुनर्विलोकनाबाबतच्या तरतुदी आणि ग्राम महसूल अधिकारी दप्तरातील गाव नमुने तक्ता स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत.
‘दुय्यम सेवा विभागीय परीक्षा (ग्राम महसूल अधिकारी संवर्ग)’ हे पुस्तक फक्त ग्राम महसूल अधिकारी संवर्गासाठीच नाही तर महसुली कायद्याचा अभ्यास करण्याची ईच्छा असणाऱ्या सर्वच महसुली अधिकाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे.
पुस्तकातील तरतुदी वाचताना संबंधित कायद्यातील मूळ आणि अद्ययावत तरतुदी विचारात घेणे अभिप्रेत आहे.
पुस्तकाबाबत आपले अभिप्राय कळविण्यास विनंती आहे.
डॉ. श्री. संजय कुंडेटकर
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.