Dombaryacha khel (डोंबाऱ्याचा खेळ)-Bhau Padhey Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
₹520.00 Original price was: ₹520.00.₹416.00Current price is: ₹416.00.
Author : Bhau Padhey
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 9788195735310
Publisher : Shabd Publication शब्द पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Dombaryacha khel (डोंबाऱ्याचा खेळ)-Bhau Padhey Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
डोंबाऱ्याचा खेळ ही भाऊ पाध्ये यांची पहिलीच आणि विविधार्थाने लक्षणीय कादंबरी एकाच वेळी मुंबईस्थित कामगारकेंद्रित समूह आणि व्यक्तिजीवनाचा समग्र वेध घेते. वेन्स्ले आयर्न वर्कर्स युनियन कादंबरीच्या केंद्रस्थानी असून, ती निवडणूकवादी आणि क्रांतिवादी अशा परस्परविरोधी कंपूत विभागलेली आहे. पुन्हा कादंबरीतील विविध युनियन्सचे समांतर जग वेगळेच. या जगात संघटित संघर्षातून बरे दिवस येतील या आशेवर जगणाऱ्या बहसंख्य कामगारांसह आदर्शवाद आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा इत्यादींनी भारलेले विविध कार्यकर्ते-पुढारी आहेत. त्यांच्या खाजगी-सार्वजनिक वर्तनातून कादंबरीत व्यापक मानवी अवकाश उभा राहिला आहे. त्यात कामगारकल्याणासाठी अविरत झटणाऱ्यांप्रमाणेच अख्खी चळवळ स्वतःच्या हितसंबंधांसाठी वापरणारी व्यक्तिमत्त्वे आहेत. कामगार चळवळीच्या जडणघडणीची आणि तिच्यातील अनेक आंतर्विरोधांची गोष्ट यातून पुढे येते. मराठी कादंबरीत कामगारजीवनाचे आतून घडविलेले असे दर्शन अभावानेच आढळते. कादंबरी वास्तववादी रचनातंत्रांचा अवलंब करत असली तरी तिची जगाकडे पाहाण्याची दृष्टी असांकेतिक आहे. कामगार चळवळ तिच्या वैचारिक आणि कृतिशील भरात असलेल्या काळात ही कादंबरी लिहिली गेली. आज नव-भांडवलशाहीच्या अपूर्व विळख्यात श्रमिक दृष्टिआड होताना डोंबाऱ्याचा खेळ अनेकार्थाने प्रस्तुत ठरते.
– डॉ. गजानन अपिने
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.