Dnyanraaj Marathi Vyakaran (द्यानराज मराठी व्याकरण)- Dnyaneshwar Aghav
मनोगत
ज्ञानराज मराठी व्याकरण हे पुस्तक अतिशय साधारण बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रित ठेऊन लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मुळात व्याकरण म्हटले की नीरस वाटणारा विषय सर्वाना अगदी सहज समजावा व त्यात आवड निर्माण व्हावी या भावनेतून या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. शाळेच्या प्रत्येक वर्गातून आपण व्याकरणाचे जवळपास सर्व घटक अभ्यासलेले असतात मात्र तरीही हा विषय बन्ऱ्याच जणांना कठीण वाटतो. स्पर्धापरीक्षेतील माझ्या प्रदीर्घ अनुभवाने मला जे व्याकरणातील बारकावे समजले ते सर्व या पुस्तकरूपाने मी आपल्या हाती सोपवत आहे.
या पुस्तकात व्याकरणातील अतिशय अवघड वाटणारे घटक अतिशय सोप्या भाषेत व अतिशय साध्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलीस भरती, सरळसेवा ते एमपीएससी इ. परीक्षांसाठी एकच मराठी व्याकरणाचे पुस्तक असावे या भूमिकेतून या पुस्तकाची रचना केलेली आहे. या पुस्तकात संपूर्ण मराठी व्याकरण, शब्दार्थ, साहित्यविषयक माहिती व घटकनिहाय चाचण्यासुद्धा समाविष्ट केलेल्या आहेत. त्यासोबतच महत्त्वपूर्ण व अवघड वाटणाऱ्या घटकांचे व्हिडिओ लेक्चर QR कोड टाकलेले आहेत. हे QR कोड आपल्या मोबाईल द्वारे स्कॅन करून आपण अवघड संकल्पना समजून घेऊ शकता अनेक संदर्भवाचण्यापेक्षा एकच संदर्भ वापरून अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी हे पुस्तक आपणांस नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा वाटते.
मागील अनेक वर्षांपासून माझ्यावर व माझ्या अध्यापनावर भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या विद्यार्थी बंधू-भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझे आई-वडील व वयाने लहान असूनही सदैव माझे मार्गदर्शन करणारी माझी लाडकी बहीण रूपाली तसेच लहानपणापासून मला घडवण्यासाठी हातभार लावणारे माझे सर्व नातेवाईक (सर्व मामा, मामी, काका, मावशी, भाऊ, बहिणी) आणि माझे सर्व गुरूजन, सहकारी शिक्षक व सर्व मित्र परिवाराचे सुध्दा हृदयापासून आभार मानतो. या आवृत्तीतील एकेक अक्षर टायपिंग करून ही आवृत्ती अतिशय सुंदर व आकर्षक बनवल्याबद्दल माझी प्रिय अर्धागिणी श्रद्धाचे मनस्वी आभार !
आपल्या सर्वांच्या सुख दुःखात पुस्तक रूपाने सदैव सोबत राहील. ही आवृत्ती वाचून झाल्याव आपल्या सुचना जरूर कळवाव्यात ही नम्र विनंती.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.