

Dhon Shatakanchya Sandhyavarachya Nondi (दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी)-Balaji Sutar Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Author : Balaji Sutar
Edition : 4 ed
Language : Marathi
ISBN : 9789382364887
Publisher : Shabd Publication शब्द पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Dhon Shatakanchya Sandhyavarachya Nondi (दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी)-Balaji Sutar Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
बालाजी सुतार यांच्या या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ म्हणजे आजच्या अर्धनागर जगाचा ‘सातबारा’ आहे. विदीर्ण, चिंध्या झालेल्या काळाची शतखंडित रूपं या कथांमध्ये काचेच्या तुकड्यांसारखी जागोजागी विखुरलेली दिसतील. हे धारदार तुकडे वाचकाच्या संवेदनेला विद्ध करून जातात. शेत शिवार, गल्ली-मोहल्ला, गाव महानगर अशा विभिन्न चित्रणक्षेत्रातले या कथांचे आशयद्रव्य म्हणजे वर्तमानातल्या घुसळणीचे कडवट रसायन.
आडदांड टाचेखाली रगडणाऱ्या अनाम जिवांच्या दुखऱ्या कहाण्या, ठेचकाळत जगणाऱ्यांच्या ‘पराभवाच्या बखरीतली काही पानं’, ठासून भरलेल्या धार्मिक उन्मादाचा दंगलींमधून तडकत जाणारा पारा, रखरखीत जमिनीच्या तुकड्यात स्वप्नं पेरणारांची होणारी राखरांगोळी, कुजून कुरतडून गेलेले ‘विनाअनुदानित’ भविष्य, राजकारणाला आलेली विकृतीची फळं, अस्मितेला लाभलेली विद्वेषाची झालर, असे सारे ‘विच्छिन्न भोवतालाचे भोवतालाचे संदर्भ’ संदर्भ यासर्व या सर्व कथांमधून समर्थपणे उजागर होतात.
बालाजी सुतार यांच्या कथांची घडण चिरेबंदी आहे. जराही टवका निघणार नाही असे आशयनिष्ठ भाषासौष्ठव या कथांना ‘कातळशिल्पा ‘प्रमाणे साकारते. अनुभवानुसार भाषेच्याही छटा या कथांमध्ये बदलत जातात. समकालाची सामर्थ्यवान अभिव्यक्ती म्हणून या नोंदींचे महत्त्व निर्विवाद आहे.
आसाराम लोमटे
लघुकथेच्या बंदिस्त परिघातून मराठी कथेला स्वतःचा मोकळा अवकाश प्राप्त करून देणाऱ्या आजच्या कथाकारांत बालाजी सुतार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा त्यांचा कथासंग्रह आजच्या मराठी कथेला स्वतःचा नवा स्वर प्राप्त करून देणारा आहे. मौखिक परंपरेला जोडून घेऊन नव्या कथनशक्यता शोधत, अनोख्या कथाबंधाची घडण जाणीवपूर्वक करत बालाजी सुतार यांची कथा वाचकासमोर येते. ती नव्या भाषेची, मूल्ययुक्त तपशिलाची जाणीवपूर्वक पेरणी जशी करते; तशीच ती आजच्या काळातले ‘सांगणे’ शोधून वाचकाला त्या सांगण्याच्या भोवऱ्यात अडकवून गरगरून टाकते. ‘दोन जगातला कवी’, ‘विच्छिन्न भोवतालाचे संदर्भ’, ‘पराभवाच्या बखरीतली काही पानं’, ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ ह्या आजच्या मराठी कथासाहित्यातील श्रेष्ठ कथा आहेत. मराठी कथासाहित्याचा किरटा झालेला स्वर ही कथा मोकळा करून स्वतःची गडद छाया निर्माण करण्याची सशक्त कामगिरी करते. बालाजी सुतार हे नाव वगळून उद्याच्या कथासाहित्याचा इतिहास लिहिता येणार नाही याची खात्री या संग्रहातील कथा देतात. हेच या कथासंग्रहाचे थोरलेपण आहे.
राजन गवस
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.