महाराष्ट्राचा भूगोल लेखक – दिपक बाविस्कर, दिलीप पाटील
सर्वांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, शिकणे हा आनंददायी प्रवास व्हावा, शिकलेले समजावे व समजलेले लक्षात रहावे, ही उद्दीष्टे ठेवून दीपस्तंम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व दीपस्तंभप्रकाशन गेली २० वर्ष कार्यरत आहे. सर्वोत्तम गूणवत्तेचा आग्रह असल्याने दीपस्तंम प्रकाशनाची पुस्तके विद्यार्थी आवर्जुन वापरतात. डॉ. किरण देसले सरांचे अर्थशास्त्र, जयदीप पाटील सरांचे विज्ञान या बहुरंगी पुस्तकांच्या अभूतपूर्व यशानंतर याच श्रेनीत श्री. दीपक बाविस्कर व श्री. दिलीप पाटील यांचे भुगोल विश्याचे पुस्तक आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करतांना मनःपूर्वक आनंद होत आहे.
अत्यंत मेहनतीने त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. दीपक बाविस्कर सराना २१ वर्षाचा तर दिलीप पाटील सरांना १७ वर्षांचा दीपस्तंभ केंद्रात स्पर्धा परिक्षांच्या अध्यापनाचा अनुभव आहे.
भारंभार माहिती न देता परिक्षामिमूख आवश्यक तेवढीच माहिती व संकल्पना या पुस्तकात समाविष्ट आहे. बहुरंगी छपाईमुळे नकाशे, आकृत्या, डाटा समजण्यास व लक्षात राहण्यास खूप मदत होणार आहे.
दीपस्तंमच्या खास शैलीतील हे पुस्तक आपल्या सर्वांना अत्यंत उपयोगी ठरेल असा मला विश्वास वाटतो. स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!
कुठलेच यश अपघाताने मिळत नाही. तुम्हाला शक्य तेवढ्याच गोष्टी न करता यशासाठी आवश्यक त्या गोष्टींची पुर्तता करा. यशस्वी व्हा!
यजुर्वेद्र अनिल महाजन कार्यकारी संचालक, दीपस्तंभ फाउंडेशन
विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो,
पु.ल. देशपांडेंनी कानडी साहित्य संमेलनात म्हटलं होत ‘उत्तम साहित्य कोणतं? उत्तम साहित्य ते, की जे आपल्या हातात आल्यावर, हे आपल्या हातून घडलं पाहिजे होत, असं वाटणं.’ आदरणीय दीपक बाविस्कर सर आणि दिलीप पाटील सरांनी निर्माण केलेलं हे साहित्य पाहिल्यावर माझ्यासह अनेक लेखकांना हेच वाटेल.
महाराष्ट्राचा भूगोल या लेखकांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सजीव करून टाकलाय, पाऊस पडल्यावर डोंगराच्या हिरवळीत पायी चालताना जो आनंद होतो तद्भत हे पुस्तक चाळताना मला झाला. लेखकांचे अभिनंदन करण्यापेक्षा त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटते. लेखक आणि पुस्तकाचे त्वचनाकर्ते यांची प्रचंड मेहनत प्रत्येक पानावर जाणवते. प्रा. यजुर्वेद्र महाजन सरांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांसाठी नवीन मेजवानी दिल्याबद्दल दीपस्तंभ प्रकाशनाचे आभार
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.