MPSC CSAT PAPER-2 PYQ 2013-2024
MPSC CSAT PAPER-2 PYQ 2013-2024 Original price was: ₹350.00.Current price is: ₹245.00.
Back to products

Corona Kalatil Jagatik Arthvyavastha कोरोना काळातील जागतिक अर्थव्यवस्था

Original price was: ₹100.00.Current price is: ₹85.00.

Author         :      Sanjeev Chandorkar

Edition         :     2021

Language   ‏  :    Marathi

Publisher    :    The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Corona Kalatil Jagatik Arthvyavastha कोरोना काळातील जागतिक अर्थव्यवस्था

Sanjeev Chandorkar

एखाद्या देशाची अर्थव्यवस्था नैसर्गिक वा तत्सम आपत्तीने ग्रासणे नवीन नाही. पण एकाचवेळी सर्व देशांच्या अर्थव्यवस्था आणि त्यामुळे आख्खी जागतिक अर्थव्यवस्था, एवढ्या दीर्घकाळ, गंभीर अरिष्टात सापडणे हे अलीकडच्या ज्ञात इतिहासात कधीच घडले नव्हते. ते कोरोनाकाळात प्रथमच घडले.

या अरिष्टामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या सर्वच उपांगांवर (उदा. जागतिक व्यापार, भांडवल गुंतवणुकी, बँकिंग आणि स्टॉक मार्केट्स, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित) झालेल्या विपरीत परिणामातून बाहेर यायला अजून काही वर्षे जावी लागतील.

कोरोना-अरिष्ट गंभीर आहेच. त्याने जगात लाखो लोक अकाली मृत्यू पावले, जगातील शेकडो कोटी सामान्य नागरिकांचे दैनंदिन आयुष्य हलाखीचे केले आणि कोट्यवधी तरुणांची भविष्यकालीन स्वप्ने अंधारून टाकली आहेत हे कोण नाकारेल.

पण अशी गंभीर अरिष्टे एकतर्फी बघायची नसतात. त्यातून जवळपास नेहमीच तयार होणाऱ्या पुनर्रचनेच्या संधीकडे देखील दुर्लक्ष करायचे नसते.

गेली 40 वर्षे भारतासकट अनेक विकसनशील देशांतील शेकडो कोटी लोकांना हालअपेष्टात ढकलणाऱ्या नवउदारमतवादी आर्थिक धोरणांचा प्रभाव राहिला आहे. आतापर्यंत अशा नवउदारमतवादी आर्थिक धोरणांत बदल होऊ शकले नाहीत कारण देशातील जनमानस तयार होत नव्हते.

कोरोनाने हे काम अंशतः पार पाडले आहे; त्याने नवउदारमतवादातील पोकळपणा नाट्यपुर्णरित्या उघडा पाडून असे जनमानस तयार करण्यासाठी नांगरणी केली आहे. याच कामातील एक खारीचा वाटा “कोरोना काळातील जागतिक अर्थव्यवस्था” हे पुस्तक उचलू पहाते.

Best Novels Book

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.