Samakalin Sanskrutik Samiksha समकालीन सांस्कृतिक समीक्षा
Samakalin Sanskrutik Samiksha समकालीन सांस्कृतिक समीक्षा Original price was: ₹270.00.Current price is: ₹203.00.
Back to products
NTA- UGC SET/ NET /JRF Paper- 1 Bhag- 2
NTA- UGC SET/ NET /JRF Paper- 1 Bhag- 2 Original price was: ₹450.00.Current price is: ₹360.00.

Corona Aapatti – Lockdown Aani Lokshahiche Apaharan

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00.

Author           :    Mukta Kulkarni, Vivek Ghotale, Bharat Patil

Edition          :    2021

Language   ‏   :   Marathi

Publisher      :   The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Corona Aapatti – Lockdown Aani Lokshahiche Apaharan / कोरोना आपत्ती- लॉकडाऊन आणि लोकशाहीचे अपहरण

Mukta Kulkarni, Vivek Ghotale, Bharat Patil

कोरोना आणि लोकशाहीचं राजकारण ह्या संदर्भात जगभर आणि भारतात जे घडतंय, त्यात तीन महत्वाचे मुद्दे आहेत. पूर्वापार चालत आलेला पहिला मुद्दा म्हणजे आकडेवारीचे राजकारण, आकडेवारीची चलाख हाताळणी ही आधुनिक भांडवली सरकारांची नेहमीची व्यूहनीती राहत आली आहे. पण कोरोना काळात ती जास्त प्रमाणात वाढलेली दिसून आली. आकडेवारी लपवणे, वेगवेगळ्या प्रकारची विसंगत आकडेवारी देणे, लोकांसमोर नीट स्पष्ट आकडेवारी न आणणे अशा प्रकारची अपारदर्शकता ठेवण्यात आली. अपारदर्शकता ही लोकशाही विरोधात जाणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे ती माहितीवरचे नियंत्रण. आज कोरोनाच्या निमित्ताने जी माहिती जमते आहे, त्या माहितीचे नियंत्रण आणि संकलन कशा पद्धतीने केल जाते आहे, हा प्रश्न आहे. डिजिटायजेशनमुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यापारी कंपन्या आणि सर्व देशांच्या राज्यसंस्था यांच्या हातामध्ये नागरिकांच्या आणि सर्व व्यवहारांच्या माहितीचा मोठा साठा निर्माण होत आहे.

येत्या काळात याच्या आधारे नागरिकांच्या सर्व व्यवहारांवर पाळत आणि काहीएक नियंत्रण ठेवणे हा उद्देश आहे. याचा अर्थ हाच होतो की नागरी जीवनावर सरकारचे-राज्यसंस्थेचे नियंत्रण वाढवणे आणि जनतेच्या नागरी स्वातंत्र्याचा संकोच करणे हाच यामागचा उद्देश आहे.

तिसरे, यातून निर्माण होणारे आणि वाढवले जाणारे वांशिक धार्मिक तणाव. भारतामध्ये दलित आणि मुस्लिमांवर तसेच स्त्रियांवर केले जाणारे सामाजिक (आणि कौटुंबिकही) अत्याचारांमध्ये वाढ झालेली दिसते. तिकडे ‘कृष्णवर्णीय’ आणि इकडे ‘मुस्लीम’ हे कोरोना प्रसाराला कारणीभूत असल्याचा विषारी प्रचार केला जातो. जातीच्या व धर्माच्या पायावर/आधारे केले जाणारे सामाजिक अत्याचार किंवा दडपशाही या गोष्टी नजरेआड ढकलल्या जातात, त्या समोर येऊ दिल्या जात नाहीत.

Best Novels Book

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.