Combine – Sanyukt Gat B va Gat K (Purva) Spashtikaranasah ) -2011 to 2025-Appa Hatnure-2025-2026
₹900.00 Original price was: ₹900.00.₹630.00Current price is: ₹630.00.
Author : Appa Hatnure
Edition : 7 ed-2025
Language : Marathi
Publisher : Lokseva Academy / Lokseva Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Combine – Sanyukt Gat B va Gat K (Purva) Spashtikaranasah ) -2011 to 2025-Appa Hatnure-2025-2026
सहाव्या आवृत्तीच्या निमित्ताने…
“Combine गट ‘ब’ व ‘क’ 2024-25 6th edition या पुस्तकाला तुम्ही दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल मी तुम्हा सर्वांचा खुप आभारी आहे. मागील Combine-B C च्या पेपरमध्ये या पुस्तकातील 44-46 प्रश्नांचा (70 पैकी) संदर्भ सापडतो. विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आलं की, सर तुमच्या पुस्तकामुळेच मी आज PSI-Mains / STI-Mains ला/ ASO Mains ला/दोन्ही/तिन्ही तसेच ESI/Tax. Asst. / Clerk मुख्यला पात्र ठरलो आहे; पण मित्रांनो, तुम्ही कोणामुळेच नाही तर तुमच्या स्वतःच्या मेहनतीमुळे पास झाला आहात हे तितकच खरं आहे.
सातव्या आवृतीत मी सर्वच पुस्तक पूर्णतः Update केलं आहे. आवश्यक त्या ठिकाणी माहिती बाढविली आहे व सद्याच्या आयोगाच्या पद्धतीनुसार पुस्तकाची रचना केलेली आहे. हे करतांना मी आर्थिक पाहणी अहवाल (भारत व महाराष्ट्र), बार्षिकी-सरकारी, Text Books, अनेक सरकारी अहवाल, दस्तऐवजाचा वापर करून अधिकाधिक विश्वसनीय बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.
हे पुस्तक अल्पावधीत विद्यार्थीप्रिय बनण्याचे कारण म्हणजे यात असणारी सोपी भाषा आणि विश्वसनीय संदर्भ यामुळे मार्क्स अधिक येण्यास Milestone ठरणारे पुस्तक आहे असे विद्याथ्यांचे म्हणणे आहे हे तितकाच खरं आहे.
मला महावी आवृत्ती अधिकाधिक विश्वसनीय व Errorless बनविण्यासाठी प्रफुल राठोड, विनायक नरवाडे, गोविंद गावडे, अजित जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
या पुस्तकात ‘महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट व पूर्व परीक्षा, 2024’ व ‘महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट क पूर्व परीक्षा, 2024’ पर्यंतच्या सर्वच पेपर्सची विषयांतर्गत घटकबाईज Latest to Old अशी प्रश्नांची रचना केली आहे. प्रत्येक घटकातील प्रश्नांचे स्पष्टीकरण देतांना प्रश्नासंबंधित स्वष्टीकरणच दिले आहे. आवश्यक त्या ठिकाणी अधिक माहिती दिली आहे. यासाठी Text Book, Govt. Sources चाच मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. प्रश्न सोडवताना Elimination Method कशी वापरायची हे देखिल सांगितले आहे. प्रश्नांची उत्तरे देताना अंतिम उत्तर पत्रिका पुन्हा-पुन्हा पाहून (जी विद्यार्थ्यांची मुख्य मागणी असते.) Errorless Book बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. यात राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशाख, विज्ञान इत्यादी विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण विश्वसनीय संदर्भ साहित्यातून दिले आहे. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या Revision साठी खूप फायदा होईल.
या पुस्तकातील सामान्य विज्ञानाचे स्पष्टीकरण देताना युबराज वाळिंबे सर व सागर निकम सर यांनी मला सहकार्य करून विद्यार्थ्यांची सामान्य विज्ञानाबद्दलची भितीच दूर केली आहे. त्याबद्दल त्यांचा मी खूप आभारी आहे. या पुस्तकाची सर्व जबाबदारी आमचे संपादक साईनाथ डहाळे सर व संतोष हातनुरे यांनी पार पाडली आहे. पुस्तक विद्यार्थ्यांच्या हातात लवकर येण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे यश त्यांच्याकडेच जाते. पुस्तक येण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी अटोकाट प्रयत्न केले ते आमचे आदरणीय समाधान भोसले सर. त्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळेच हे पुस्तक सर्वसमावेश बनले आहे आणि शेवटी सांगायचे म्हणजे पूर्वीच्या पुस्तकात आणि आताच्या पुस्तकातही माझा भाऊ संतोष हातनुरे (संपादक) याने मला खूप महत्त्वपूर्ण मदत या पुस्तकरुपाने केली आहे. त्यासाठी त्याचा येथे विशेष उल्लेख करावा लागेल.
सरतेशेवटी ज्यांच्याशिवाय हे पुस्तक तयार होऊ शकले नसते ते आमचे किरण पोटे सर, भस्तक निकम यांचा विशेष उल्लेख मला करावा लागेल. त्यांनीच या पुस्तकात साधी, सोपी, व सुटसुटीत रचना केली आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.