Combine Logic Booster Sanyukt Gat ‘B’ Va Gat ‘K Approach Explanation Prediction-Shitole, Dilip Khatekar
लेखकाचे मनोगत
नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो,
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त (गट ब व क) पूर्व परीक्षेच्या 2024 सालच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व पदांसाठी उपयुक्त ‘COMBINE LOGIC BOOSTER’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती भाबी प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देताना खूप आनंद होतो आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना येणाऱ्या विविध समस्या आणि अडचणी, यांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने स्टेप अप अकेडमीचे संचालक दिलीप सर आणि स्टेप अप टीमसोबत चर्चा करून सर्वानुमते एक शाश्वत आणि सर्वांगाने उपयुक्त अशी व्यूहनीती तयार केली, जेणेकरून आम्हाला आलेल्या अडचणी तसेच समस्या इतर परीक्षार्थीना घेऊ नयेत या व्यापक विचारातूनच या दर्जेदार पुस्तकाची संकल्पना साकारली आहे.
‘COMBINE LOGIC BOOSTER’ या पुस्तकामध्ये Logic विकसित होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच परीक्षा हॉल मध्ये तुम्ही काय विचार करायला हवा? तुम्ही अभ्यास केलेल्या विषयाच्या माहितीचे म्हणजेच चौकटीतील माहितीचे कसे Application कराचे? कोणत्या विषयाची काय डिमांड आहे? हे सर्व समजण्यास पुस्तकाची नक्कीच मदत होईल. दिवसेंदिवस वेगवेगळ्या परीक्षांचा कट ऑफ बाढत आहे. त्यामुळे प्रत्राच्या संदर्भावरून स्पष्टीकरणासोबतच Prediction आणि चौकटीबाहेरच्या प्रश्नांना आपण कशाप्रकारे Logic/Approach च्या आधारावर सोडवायला हवे यांवर सखोल विश्लेषण करणे भविष्यात अपरिहार्य बनले आहे. बाबाचीचीसुध्दा मांडणी पुस्तकात केली आहे.
समाजसुधारकांचे फोटो, नकाशे, आकृत्यांद्वारे परीक्षार्थीना कल्पना करून माहिती लक्षात ठेवणे सोपे होणार आहे. यामुळे पुस्तकाची गुणवत्ता आणखी उंचावताना दिसत आहे. मी स्वतः एक परीक्षार्थी असल्याने शक्य तेवढ्या परीक्षेच्या आयामांचा विचार करून प्रत्रपत्रिकांचे विश्लेषण जरी कंबाईन परीक्षेचे असले तरी संबंधित स्पष्टीकरणात दिली गेलेली माहिती ही सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून सर्वसामवेशक उपयुक्त उपयुक्त ठरावी अशी देण्यात आली आहे. ‘COMBINE LOGIC BOOSTER’ पुस्तक वापरणाऱ्या परीक्षार्थीना इतर संदर्भ साहित्य पडताळण्याची आवश्यकता नाही, एवढी गुणवत्तापूर्ण प्रमाणित माहिती संकलित करून एकाच ठिकाणी देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. नव्याने अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थीनाही पहिल्याच वाचनात समजेल अशा मुद्देसूद आणि सोप्या भाषेत पुस्तकाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्टेप अप अॅकडमीचे संचालक आणि पुस्तकाचे संपादक मा. श्री. दिलीप खाटेकर सर यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आणि सहकार्यामुळे मी हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहचवू शकलो. त्यामुळे त्यांचा मी प्रथमः खूप खूप आभारी आहे. स्टेप अप टीममधील प्रेमराज चव्हाण सर, प्रवीण दांगटे सर, श्रीकांत तायडे सर, दिलीप मुसळे सर, तानाजी इंगोले सर, भूषण सावंत सर, विनायक मेटे सर, श्रीधर गालिदे सर, गुंजन मेश्राम सर, ज्ञानेश्वर मगर सर आणि मराठीच्या शुद्धलेखनामध्ये सुधारणा करण्यासाठी नामदेव जाधव सर या सर्वांचे योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आणि इथून पुढेही लाभेल या अपेक्षेसह सर्वांचे मनापासून आभार. या सर्व प्रवासामध्ये माझ्या सदैव पाठीशी उभी असणारी माझी आई, माझी अर्धागिणी शुभांगी (सहायक आयुक्त महानगरपालिका) आणि लहान भाऊ स्वप्निल (महाराष्ट्र पोलीस) यांच्यामुळे हे काम करताना मला नेहमीच पाठिंबा आणि प्रोत्साहन लाभले. पुस्तकाविषयी अभिप्राय देणारे सर्व अधिकारी तसेच परीक्षार्थी मित्र या सर्वांचे सुद्धा मनापासून आभार.
स्टेप अप अकॅडमी मधील सिद्धी मॅडम, श्रद्धा मॅडम, अपूर्वा मॅडम तसेच कमी कालावधीत आणि योग्य वेळी ज्यांच्यामुळे मी हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहचवू शकलो ते म्हणजे डिटीपी टीममधील प्रामुख्याने विद्या दोडके मॅडम तसेच भाग्यश्री घुणकीकर मॅडम, ज्योत्स्ना दाढे मॅडम, लक्ष्मी तमंग मॅडम आणि सुवर्णा माटोरे मॅडम तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मला मदत करणाऱ्या सर्वांचेच खूप खूप आभार.
परीक्षार्थीच्याच विश्वासाने लिहिलेल्या या पुस्तकातील माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु काही बदन किंवा सूचना असतील तर नक्की कळवावे. यामुळे पुस्तकाचा दर्जा आणखी उंचावण्यात आम्हाला मदतच होईल.
सर्व स्पर्धा परीक्षार्थीना पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा…!
ALL THE BEST.
आपलाच, अविनाश शितोळे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.