Chhatrapati Shivaji Maharaj Charitra (छत्रपती शिवाजी महाराज चरित्र)-K A Keluskar Marathi Book katha-kadambari (Novel)
मराठा प्रॉव्हिडंट फंडचे उत्पादक कै. रा. रा. गोविंदराव कृष्णराव दळवी यांच्या मनांत हे चरित्र लिहिण्याची कल्पना प्रथम आली होती; परंतु ते अल्पायू झाल्याकारणाने त्याचा तो संकल्प असिद्ध राहिला. पुढे ह्या फंडाच्या चालकांनी प्रस्तुत लेखकास हे काम सांगितले; परंतु महाराष्ट्रातील एक-दोन विद्वान गृहस्थ शिवाजी महाराजांचे चरित्र लिहीत आहेत असे कळल्यावरून व केसरी पत्रकारांकडे शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सन १८९५पासून जमा होत असलेल्या हजारो रुपयांपैकी थोड्याशा रकमेचा विनियोग महाराजांचे एखादे चरित्र लिहवून छापण्याकडे होऊन ते सर्व लोकांस खिस्ती धर्मपुस्तकांप्रमाणे अगदी अल्प किंमतीस विकत मिळण्याचा योग येईल असे वाटल्यावरून त्याने हे काम हाती घेतले नाही, परंतु पुढे सहा-सात वर्षेपर्यंत ह्या विद्वानांकडून एकही चरित्र प्रसिद्ध होईना व केसरीकारांकडे जमलेली रक्कम तशीच पडून राहिली, असे पाहून आपण तरी आपल्या शक्तीप्रमाणे सांप्रत अनुकूल असलेल्या माहितीचा आधार घेऊन शिवरायांचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न करावा व परमप्रिय मित्राचा सदुद्देश सिद्धीस न्यावा, असे त्यांच्या मनांत आले आणि ह्या उद्योगास तो लागला. त्याचे हे फळ आज महाराष्ट्रीयांच्या पुढे ठेवण्यास तो समर्थ झाला याबद्दल त्यास अत्यानंद वाटत आहे. हे फळ लहान असून अपक्व आहे किंवा यांत असावा तसा गोड रस नाही किंवा हे अगदीच बेचव आहे असे भिन्नरुची वाचकांना कदाचित् वाटेल; परंतु एक कुशल बागवान नुसते बीज व खत जमा करण्यांतच अद्यापि गुंतला आहे व दुसरा देशांतराहून कलमे आणण्याच्या उद्योगात मग्न झाला आहे तोपर्यंत जे फारसे चोखंदळ नाहीत अशा साध्या जनांच्या क्षुधातृप्तीस हे फळ दुसऱ्या रसभरित फळांच्या अभावी थोडेसे तरी उपयोगी पडेल अशी उमेद आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.