Chhatrapati Shivaji (छत्रपती शिवाजी )-Setu Madhavrao Pagadi Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
₹350.00 Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00.
Author : Setu Madhavrao Pagadi
Edition : 2 ed
Language : Marathi
ISBN : 23486
Publisher : Continental Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Chhatrapati Shivaji (छत्रपती शिवाजी )-Setu Madhavrao Pagadi Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
प्रस्तावना
बाबरने १५२६ मध्ये भारतात मोगल साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याचा विस्तार करून अकबरने बळकटी आणली. शेवटचा महान मोगल औरंगजेब बादशहा इ.स. १६५८ मध्ये तख्तावर आरूढ झाला तेव्हा साम्राज्य भरभराटीच्या उच्च शिखरावर होते. त्याचा अंमल उत्तरेकडे काबूलपासून दक्षिणेकडे भीमा नदीपर्यंत आणि पूर्वेकडे आसामच्या सरहद्दीपासून पश्चिमेकडे गुजराथपर्यंत विस्तारला होता. मोगल साम्राज्याला शह देणारी एकही सत्ता त्याकाळी भारतात नव्हती. दिल्लीमधील लाल किल्ला आणि जामा मस्जिद सारख्या भव्य इमारती आणि स्वर्गीय सौंदर्याचा आग्याचा देखणा ताजमहाल हे त्या साम्राज्याची श्रीमंती आणि समृद्धी प्रतिबिंबित करतात. झगमगाट, दौलत आणि वैभव यामुळे महान मोगलांच्या नावाची किमया जगभर पसरली होती.
१६५८ मध्ये अशी परिस्थिती होती. १६७० पासून बादशहा औरंगजेब उत्तर-पश्चिमेकडील अफगाण टोळ्यांशी युद्ध करण्यात गुंतला होता. मराठ्यांशी शिवाजीच्या नेतृत्वाखाली त्याच वर्षी सुरू झालेलं युद्ध औरंगजेबच्या १७०७मधील मृत्यूपर्यंत चालू राहणार होतं. राजपुतांशी १६७८ मध्ये सुरू झालेलं युद्धपण बादशहाच्या मृत्युनेच संपुष्टात आलं.
औरंगजेबच्या मृत्यूनंतरच्या तीस वर्षात मोगल बादशहाच्या हातात सत्ता राहिली नाही. हिंदुस्थानभर मराठ्यांचं राज्य पसरलं आणि संपूर्ण उपखंडाचं सार्वभौमत्व जिंकण्याच्या अगदी समीप मराठे आले. औरंगजेबचा वंशज शाह आलम १७८४ मध्ये मराठ्यांच्या हातात निवृत्तिवेतनधारक बनला.
ही क्रांती कशी घडली? मोगल सल्तनतला पहिलं गंभीर आव्हान ज्या मराठ्यांनी दिलं आणि साम्राज्यास जेरीस आणलं त्यांना शिवाजीसारखा प्रतिभावान योजक आणि नेता लाभला. विखुरलेल्या आणि क्षुल्लक कलहांनी दुर्बल झालेल्या एका समाजाला शिवाजीने कुशाग्र बुद्धीने एकसंध करून देश उभारला आणि सत्ता आणि यश मिळवून दिलं. जन्मजात नेतृत्वगुण अंगी असणाऱ्या या नेत्याला मोगल साम्राज्याचा विनाशी कमकुवतपणा समजून आला जो कोणाही समकालीन सत्तेला कळला नाही.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.