Case No.533/2007 (केस नं.५३३/२००७)-Shambhuraj Jadhav Marathi Book katha-kadambari (Novel)
मनोगत
‘नक्की दोष कोणाचा?’ ही पहिली कादंबरी लिहून झाल्यानंतर माइस मनात सतत काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं करण्याची इच्छा निर्माण होत होती. पण नक्की काय करावं तेच सुचत नव्हतं. एखादा नवीन विषय घेऊन लेखन करावे की, काहीतरी आगळंवेगळं करावं या विचारात मी सतत गुंतलेलो असायचो. साधारण वर्षभराचा काळ असाच लोटला. मी माझ्या नोकरीच्या कामांमध्ये सतत व्यस्त असल्यामुळे नवीन काहीच करू शकत नव्हतो. चित्रपट आणि नवीन प्रदर्शित होणारी गाणी यामध्ये माझी पहिल्यापासूनच रूची होती. कोणताही चित्रपट पाहत असताना सर्वप्रथम मी त्या चित्रपटाच्या पटकथेचा विचार करायचो. त्याचे दिग्दर्शन कसे केले असावे, त्याचा हा सीन कशाप्रकारे शूट केला असावा, कॅमेरा कोणत्या अँगलने पकडला असेल, अभिनेत्याने कशाप्रकारे अॅक्टींग केली आहे या सर्व गोष्टींचा मी चित्रपट पाहत असतानाच बारीक विचार करत असे. त्यावेळी मला ‘आपणही एखादा चित्रपट तयार करावा’ अशी इच्छा निर्माण होत असे. अर्थात ही गोष्ट म्हणजे एखाद्या लहान बाळाने न मिळणाऱ्या गोष्टीचा हट्ट करावा अशीच होती. कारण चित्रपट निर्मिती म्हणजे तारेवरची कसरतच असते. परंतू मी सिनेमा कसा तयार करतात ? त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. सगळ्यात पहिल्यांदा सिनेमाची स्क्रीफ्ट कशी लिहितात ? कॅमेरा अँगल कोणते असतात ? कशाप्रकारे शुटींग करावी लागते? त्यासाठी काय-काय सामग्री आवश्यक असते? शेवटी चित्रपटाचे एडिटींग कसे करतात ? आणि चित्रपट कशा प्रकारे प्रदर्शित करतात? या सर्व गोष्टींची मी माहिती मिळवू लागलो. अर्थात माझ्या या वेडेपणावर माझ्या घरच्यांकडूनही
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.