Blogchya Aarshapalyad (ब्लॉगच्या आरश्यापल्याड)-Manaswini Lata Ravindra Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
Author : Manaswini Lata Ravindra
Edition : 2 ed
Language : Marathi
ISBN : 9789382364313
Publisher : Shabd Publication शब्द पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Blogchya Aarshapalyad (ब्लॉगच्या आरश्यापल्याड)-Manaswini Lata Ravindra Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
मराठी कथेने गेल्या काही वर्षात घेतलेली उसळी उत्साहवर्धक आहे. त्यातही कथा या वाङ्मयप्रकाराच्या किरटेपणाकडे निर्देश करत त्यावर केलेल्या हल्ल्यामुळे स्वतः च्या कोशात जाऊन निमूट झालेल्या महानगरी कथावाङ्मयाने धारण केलेला बहुमुखी अवतार अचंबित करणारा आहे. या महानगरी कथाविश्वात मनस्विनी लता रवींद्रच्या कथेने आश्वासक पाऊल टाकले आहे त्याच्या खुणा तिच्या या पहिल्याच कथासंग्रहात स्पष्टपणे उमटलेल्या दिसतात.
जागतिकीकरणोत्तर कालखंडात एकविसाव्या शतकाच्या आरंभी साहित्याच्या क्षितिजावर आलेली ही तरुण लेखिका स्वतःकडे आणि आपल्या भवतालाकडे बोटपणे बघताना, त्यातलं उत्तम आणि हीण आत्मीयतेने निरखत त्याची अभिव्यक्ती बेधडकपणे करताना दिसते. हा बेधडकपणा तिच्या पिढीचाच स्थायीभाव आहे, हे खरं असलं तरी जगण्याची व्यामिश्रता समजून घेण्याची तयारी नसणं हाही तिव्या पिढीचा स्थायीभाव आहे. अर्थात याला अपवाद असणारे जे थोडेबहुत आपल्या अवतीभवती आहेत. त्यात मनस्विनीची उपस्थिती ठळक आहे, कारण ती या व्यामिश्रतेला केवळ समजून घेत नाही तर, तिच्या पोटातला धाग्यांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करते. सुटलेले धागे उकलून बघते. या प्रयत्नात तिला मानवी नातेसंबंधांतली विदीर्णता आणि तिच्या तळाशी असलेलं माणसाचं एकटेपण दिसतं. जगण्याला नव्याने झटण्याची, नवी सुरुवात करण्याची जशी उमेद दिसते तशीच कशाशीही जोडले न जाण्यातून, तुटलेपणातून येणारी हतबलताही दिसते. या सगळ्यातून होणारा आनंद, येणारं दुःख वा कोणतीही भावना घडपणे व्यक्त न होण्याचा अनुभव येणं यामागे महानगरी जीवनशैलीने लादलेली एक अपरिहार्यता आहे. ती कोणत्याही अनुभवापाशी फार रेंगाळू न देता माणसांना पुढच्या क्षणाकडे खेचत नेते. यातला वेग आणि आवेग मनस्विनीच्या कथांमध्ये उतरताना दिसतो. त्यामुळेच तिची भाषाही पारंपरिक राहात नाही. पण या सगळ्या पलीकडे जात ती आजच्या जगण्यातल्या ताण्या-वाण्यांच्या आड असलेलं लिंगभावाचं आणि जातीयतेचं राजकारण जाणून घेत त्याचा तरल आविष्कार करते, हे तिच्या कथांच वेगळेपण आहे.
जयंत पवार
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.