Bhartiya Samaj GS-Paper-1 UPSC-MPSC-Gunjan Meshram Sampadak Dilip Khatekar (भारतीय समाज) Step Up
₹250.00 Original price was: ₹250.00.₹175.00Current price is: ₹175.00.
Author : Gunjan Meshram Sampadak Dilip Khatekar
Edition : 1 ed 2025
Language : Marathi
ISBN : 9788199248779
Publisher : STEP UP ACADEMY
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Bhartiya Samaj GS-Paper-1 UPSC-MPSC-Gunjan Meshram Sampadak Dilip Khatekar (भारतीय समाज) Step Up
संपादकीय
सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार
UPSC च्या नागरी सेवेच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलवल्यानंतर मराठी भाषेतूर राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर दर्जेदार साहित्य उपलब्ध असण्याबद्दल बरेच प्रश्न निर्माण झाले. स्टेप-अप अकॅडमीने सुरुवातीपासूनब आपल्या दर्जेदार साहित्याबद्दल विद्याथ्यांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच LIPSC किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी भारतीय समाज पुस्तक (सामान्य अध्ययन-1) हे पुस्तक आम्ही आपल्यासमोर उपलब्ध करून देत आहोत.
भारतीय समाज हे पुस्तक सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर असे जाणवते की भारतीय समाज हा घटक साधारणपणे 250 पैकी 60 ते 120 गुणांसाठी विचारला जातो. विद्यार्थी बऱ्याच वेळा इतिहास आणि भूगोल या घटकावर जास्त भर देतात परंतु हा घटक सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मार्क मिळण्याच्या उद्देशाने विचार केल्यास हे पुस्तक तुम्हाला शंभर टक्के उपयुक्त ठरणारच आहे परंतु व्यक्ती म्हणून भारतीय समाजाचा अभ्यास करत असताना आणि त्या अनुषंगाने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जो सकारात्मक बदल घडवणार आहात त्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी या पुस्तकातून अभ्यास करत असताना आपले मिळणारे मार्क्स वाढवणे हे सुद्धा महत्त्वाचे असणारच आहे त्याचबरोबर आपले आयुष्य सत्काराणी लावण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा परंतु यातील गोष्टी अंमलात नकी आणा.
साधारणपणे पूर्व परीक्षेच्या अगोदर मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यास तुमचा झालेला असणे अपेक्षित असते. परंतु यावेळी राज्यसेवेमध्ये नवीन पॅटर्न असल्याने बहुतेक विद्यार्थ्यांना हा विषय नवीन आहे. या विषयाचा अभ्यास करत असताना पुस्तके वाचाच परंतु समाजाचं काळजीपूर्वक निरीक्षण सुद्धा करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये तुम्ही तयार केलेली स्वतःची आयुष्यातली व्यक्तिगत उदाहरणे सुद्धा उतरवू शकता.
स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये स्टेप अप अकॅडमी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा प्रत्येक टप्प्यावर सोबत आहे. आम्ही या सर्व प्रवासासाठी दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देतच राहू, यासाठी आम्हाला तुमची ही मदत लागणार आहे. तुम्ही हे पुस्तक अभ्यासाल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा नक्की होईल. आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा जेणेकरून पुढील आवृत्ती मध्ये आम्हाला सुधारणा करण्याची संधी मिळेल.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.