Bhartiya Rashtriya Chalval (भारतीय राष्ट्रीय चळवळ)-Jyoti Ramod
भूमिका
शिक्षण, प्रशिक्षण आणि विशेषतः संशोधन यांद्वारे सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय क्षेत्रात सकारात्मक हस्तक्षेप घडवून आणणे, हे उद्दिष्ट ठेवून सार्वजनिक क्षेत्रात उतरलेल्या ‘द युनिक फाउंडेशन’ने विविध कळीच्या प्रश्नांवरील संशोधन प्रकल्प, आशयघन पुस्तक प्रकाशन, चर्चा, परिसंवाद व व्याख्यानमाला यांसारखे उपक्रम राबवले आहेत. या कामाचा एक भाग म्हणून संस्था पाठ्यपुस्तके आणि पूरक वाचन साहित्य निर्मिती करीत आहे.
ज्ञानप्राप्तीसाठी अभ्यासक्रम आणि त्याच्याशी सुसंगत पाठ्यपुस्तके (Text Books) असणे आवश्यक असते. शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत पाठ्यपुस्तके ही ज्ञान निर्मितीसोबतच सार्वजनिक दृष्टिकोन आकारास येण्यासाठीचे मूलभूत साधन असते. पाठ्यपुस्तकांचे महत्त्व व आवश्यकता लक्षात घेऊन ‘युनिक फाउंडेशन प्रकाशना’ मार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास (NEP-2020) लागू होणारी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) बदललेल्या अभ्यासक्रम व नवीन पॅटर्ननुसार काही पुस्तके प्रकाशित करीत आहोत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP-2020) सर्वच विद्यापीठांचे आणि स्वायत्त महाविद्यालयांचे अभ्यासक्रम बदलले आहेत. त्यानुसार बी.ए. आणि एम.ए. अभ्यासक्रमाची काही विषयांवरील पुस्तके संस्थेमार्फत प्रकाशित करीत आहोत. संस्थेने यापूर्वी काही महत्त्वपूर्ण विषयांवर संशोधन करून त्याचे अहवाल प्रकाशित केले आहेत. शिवाय, काही सामाजिक-शैक्षणिक प्रश्न आणि वैचारिक मंथन करणारी पुस्तके प्रकाशित केली आहेत. आता विषयतज्ज्ञ अभ्यासकांच्या सहकार्याने अभ्यासक्रमावर आधारीत काही पुस्तके प्रकाशित करीत आहोत.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.