Bhartiya Karbhar Prakriya Vikas Ani Samajik Kalyan Samanya Tukaram Jadhav Mahesh Shirapurkar Adhyayan GS Paper 2 Unique (Governance Social Welfare)

Original price was: ₹360.00.Current price is: ₹252.00.

Author         : Tukaram Jadhav Mahesh Shirapurkar A

Edition         : 1 ed  ( 2026 )

Language  ‏  :   Marathi

Publisher: ‎ :   Unique Academy Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Bhartiya Karbhar Prakriya Vikas Ani Samajik Kalyan Samanya Tukaram Jadhav Mahesh Shirapurkar Adhyayan GS Paper 2 Unique (Governance Social Welfare)

प्रस्तावना

संघ लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या नागरी सेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सामान्य अध्ययनाच्या एकूण चार पेपरपैकी एक महत्त्वपूर्ण पेपर म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक-2, ज्यात ‘भारतीय राज्यव्यवस्था आंतरराष्ट्रीय संबंध हे दोन विषय समाविष्ट आहेत. भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये ‘भारतीय राज्यघटना, शासन व प्रशासन’ तसेच ‘कारभारप्रक्रिया व सामाजिक विकास’ या दोन विभागांचा समावेश होतो, प्रस्तुत ‘भारतीय कारभारप्रक्रिया, विकास आणि सामाजिक कल्याण’ हे पुस्तक या विभागाची सविस्तर चर्चा करणारे आहे.

वस्तुतः भारतीय राज्यघटनेच्या पूर्व परीक्षेत काही प्रमाणात अभ्यास समाविष्ट होतो, ज्याचा मुख्य परीक्षेतील पुढील अभ्यासासाठी उपयोग होतो. मात्र कारभारप्रक्रिया व सामाजिक विकास हा विभाग बऱ्याच प्रमाणात अनोळखी व नवा असल्याने सामान्य अध्ययन पेपर 2 च्या तयारीत कळीचा ठरतो. प्रस्तुत संदर्भ पुस्तक विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन त्यावर उपाय सुचविते.

‘भारतीय कारभारप्रक्रिया, विकास आणि सामाजिक कल्याण’ या विभागातील सर्व सातही प्रकरणांची सखोल चर्चा या पुस्तकात केलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना सुलभपणे सादर केलेल्या आहेत. कारभारप्रक्रिया, चांगली कारभारप्रक्रिया; विकास, वृद्धी, मानवी विकास, शाश्वत विकास; सामाजिक क्षेत्र व कल्याणकारी उपाय अशा विविध पायाभूत संकल्पनांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट केलेला आहे. हे संकल्पनात्मक आकलन चालू व समकालीन घडामोडींच्या अभ्यासात कळीचे ठरते.

कारभारप्रक्रिया व विकास प्रक्रियेच्या सर्वांगीण अभ्यासात विविध शासकीय व बिगर-शासकीय उपायांची चर्चा नितांत महत्त्वाची ठरते. त्यादृष्टीने कायदे, धोरणे, योजना तसेच विविध प्रकल्प इ. चा प्रत्येक प्रकरणात समावेश केला आहे. या संदर्भातील एक निर्णायक महत्त्वाची बाब म्हणजे विविध क्षेत्रांतील ‘प्रयोग’ होय. अशा प्रयोगाच्या अभ्यासाद्वारे कारभारप्रक्रिया कशी राबविली जाते, त्यात कोणती आव्हाने भेडसावतात आणि त्यावर कशी मात केली जाते, हे समजून घेता येते. एवढेच नव्हे तर त्या-त्या क्षेत्रात कोणत्या उपाययोजना करता येतील हेदेखील सुचविणे सुलभ ठरते.

उपरोक्त पुढाकारांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, संघटना आणि रचना अशा यंत्रणांचाही समर्पक ठिकाणी समावेश केलेला आहे. या संस्थांची केवळ कार्ये व अधिकारच नव्हे, तर प्रत्यक्षातील कामकाज (व्यवहार) याचाही आढावा घेतला आहे. अशा रीतीने, त्या-त्या यंत्रणांचा सविस्तर लेखा-जोखाही मांडला आहे.

‘कारभार व विकास’ ही प्रत्यक्ष राबविण्यात येणारी प्रक्रिया असल्याने त्यासंदर्भातील क्षेत्रनिहाय योग्य उदाहरणे व दाखले महत्त्वाचे ठरतात. त्यादृष्टीने स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवरील उदाहरणांचा समावेश केलेला आहे. अशा उदाहरणांद्वारे कारभार व विकास प्रक्रियेची पुढील दिशा ठरविणे सोईचे ठरते.

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.