Bhartiya Arthvyavastha Ani Arthik Vikas Swapnil Ukirde Samanya Adhyayan GS Paper 3 Unique

Original price was: ₹500.00.Current price is: ₹350.00.

Author         : Swapnil Ukirde

Edition         : 1 ed  ( 2026 )

Language  ‏  :   Marathi

Publisher: ‎ :   Unique Academy Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Bhartiya Arthvyavastha Ani Arthik Vikas Swapnil Ukirde Samanya Adhyayan GS Paper 3 Unique

प्रस्तावना

यूपीएससी व एमपीएससी (राज्यसेवा) नागरी सेवा मुख्य परीक्षेतील पेपर क्र. मधील प्रमुख विषय म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था होय. अर्थशास्त्रीय संकल्पना, अर्थव्यवस्त होणारे सातत्यपूर्ण बदल आणि कल, शासकीय तसेच बाजारव्यवस्थेत घेतलेले पुढाकार आणि विविध क्षेत्रासंबंधीची आकडेवारी या प्रमुख कारणांमुळे अर्थशास्त्राची शैक्षणिक पार्श्वभूमी नसणाऱ्या विद्या अर्थव्यव हा विषय काहीसा कठीण, आव्हानात्मक व वेळखाऊ वाटू शकतो. त्यातही मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून पुरेसे, दर्जेदार व अद्ययावत संदर्भ साहित्य पुस्तकाने उपलब्ध नव्हते. वस्तुतः मराठी भाषेतून काही पुस्तके उपलब्ध असली तरी लोकसेवा आयोगाच्या गतिशील अभ्यासक्रमाच्या प्रभावी तयारीसाठी पुरेसे ठरेल असे एकही संदर्भ पुस्तक नव्हते. ‘द गुनिक प्रकाशना’ने विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेऊनच प्रस्तुत ‘भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास’ हे पुस्तक निर्माण करण्याचे ठरविले.

‘भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास’ हे स्वप्निल उकिडे लिखित पुस्तक अर्थव्यवस्तीच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रकरणांचा सविस्तर आणि सखोलपणे आढावा घेते. एकूण 10 प्रकरणांमध्ये विभागलेले हे पुस्तक मूलभूत आर्थिक संकल्पनांच्या चर्चेद्वारे अर्थव्यवस्थेच्या विश्लेषणास सुरुवात करते, हे नोंदविणे महत्त्वाचे आहे. कारण बहुतांश विद्यार्थ्यांना या संकल्पनांची पार्श्वभूमी नसल्याने अर्थव्यवस्था समजून घेताना अडचणी येतात, हे लक्षात घेऊन प्रत्येक प्रकरणात पायाभूत संकल्पनांची सोदाहरण चर्चा केली आहे.

अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्राची चर्चा करताना स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरुवात करून गेल्या 20-30 वर्षांमध्ये जे महत्त्वपूर्ण बदल घडून आले, त्यावर विशेष भर दिलेला आहे. त्या त्या क्षेत्राची प्रारंभिक स्थिती, पुढे झालेले बदल, समस्या, योजलेले उपाय, सद्यःस्थिती आणि पुढील वाटचाल अशा सर्व महत्त्वपूर्ण आयामांचा समावेश केलेला आहे. प्रकरणनिहाय लेखन करतांना केवळ तथ्यं-माहिती वर्णनात्मक स्वरूपात सादर केली नसून तिचे यथायोग्य विश्लेषणदेखील केले आहे, जेणेकरून प्रत्येक अभ्यासघटक समजून घेण्यास सुलभ ठरेल.

अर्थव्यवस्था म्हटले की ‘सांख्यिकी’ वा ‘आकडेवारी’ हा कळीचा घटक ठरतो. त्यातही एका बाजूला अधिकृत स्रोत आणि दुसऱ्या बाजूला अद्ययावतता अशा दोन्ही बाबींची खात्री देणे आव्हानात्मक ठरते. लेखकाने अत्यंत परिश्रमपूर्वक विविध राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक संस्थांच्या सर्वेक्षण व अहवालाचा आधार घेऊन सर्व घटकांसंदर्भात विविध स्वरूपांची आकडेवारी समाविष्ट केली आहे. तसेच या आकडेवारीचे विविध पद्धतींद्वारे अत्यंत प्रभावीपणे सादरीकरण केलेले आहे. अशा रीतीने, तथ्ये-माहिती, आकडेवारी आणि विश्लेषण यांचा उत्तम मेळ घातलेला आहे.

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.