Bhartiya Arthvyavastha (भारतीय अर्थव्यवस्था)-lata diganbar dhende Unique
₹280.00 Original price was: ₹280.00.₹224.00Current price is: ₹224.00.
Author : lata diganbar dhende
Edition : 2025
Language : Marathi
Publisher : The Unique Foundation
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Bhartiya Arthvyavastha (भारतीय अर्थव्यवस्था)-lata diganbar dhende Unique
मनोगत
भारतीय अर्थव्यवस्था ही वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था असून, २०३० पर्यंत ती जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास आहे. १९९१ नंतरच्या आर्थिक सुधारणा, जागतिक आर्थिक व राजकीय धोरणांमध्ये सक्रिय सहभाग, विकासाभिमुख धोरणात्मक निर्णय, कोविड-१९ नंतरचे सकारात्मक बदल आणि स्थानिक शासनाचा आर्थिक विकास नीती मधील सहभाग यामुळे भारतीय अर्थव्यवस्था सक्षम बनली आहे. भारतातील शेती, उद्योग आणि सेवाक्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. जागतिक व्यापार व गुंतवणूक, नवप्रवर्तन, कौशल्य विकास इत्यादींमध्ये भारताने उल्लेखनीय प्रगती केली असली तरी, बेरोजगारी, कुपोषण, भूक, दारिद्रय, असमानता, पायाभूत सुविधांची कमतरता आणि श्रम बाजारातील स्त्री पुरुष असमानता अशा अजूनही गंभीर समस्या देशात आहेत. विकसित देशांच्या तुलनेत काही बाबतीत आजही आपण
पिछाडीवर आहोत.
स्वातंत्र्यापासून ते वर्तमानकालीन आमूलाग्र सामाजिक आर्थिक बदलाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार ‘भारतीय अर्थव्यवस्था’ हा प्रथम वर्ष कला शाखेसाठीचा (FYBA) अभ्यासक्रम जून २०२४-
२५ पासून लागू केला आहे. त्या अनुषंगाने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. सदर पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख, शेती, उद्योग, सेवा क्षेत्र, लोकसंख्या व नियोजन, आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, दारिद्र्य, असमानता व बेरोजगारी अशी प्रथम सत्र व द्वितीय सत्र मिळून सहा प्रकरणे आहेत. त्याबरोबरच दोन सत्रांच्या प्रात्यक्षिकांसाठीही मार्गदर्शन केले आहे. पुस्तक लेखनासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले दर्जेदार संदर्भग्रंथ, शासनाचे अधिकृत सर्वेक्षण अहवाल व संशोधनपर साहित्य वापरले असून, अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थशास्त्रीय परिभाषा सुलभ भाषेत स्पष्ट केल्या आहेत. प्रकरणांच्या शेवटी स्वाध्यायासाठी विविध प्रकारचे प्रश्न दिले आहेत. हे पुस्तक केवळ पुणे विद्यापीठातीलच नव्हे, तर अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल याची लेखक म्हणून मला खात्री आहे. तसेच पुस्तक अधिक उत्तम व उपयुक्त होण्यासाठी वाचकांनी दिलेल्या सूचना व अभिप्राय यांचा सुधारीत आवृत्तीच्या वेळी आवर्जुन विचार केला जाईल. प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर वाचकांकडून या पुस्तकाचे निश्चितच स्वागत होईल अशी आशा आहे. –
डॉ. लता दि. धेंडे
Available at Ksagar Book Store or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.