Back to products
Shikshak Abhiyogyata va Buddhimatta Chachani (TAIT) Pariksha
Shikshak Abhiyogyata va Buddhimatta Chachani (TAIT) Pariksha Original price was: ₹780.00.Current price is: ₹546.00.

Bhartache Parrashtra Dhoran Anterrashtriya Rajkaran (Bharat Ani Jag) Antarrashtriya Sanghatna

Original price was: ₹525.00.Current price is: ₹394.00.

Author         :     प्रा. व्ही. बी. पाटील । के ‘सागर विजय नाईक (ज्येष्ठ पत्रकार, आंतरराष्ट्रीय संबंध), डॉ. हर्षवर्धन यादव । प्रियांका गाडे

Edition         :    1St 2025

Language  ‏  :    Marathi

Publisher   ‎ :    K’sagar Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Bhartache Parrashtra Dhoran Anterrashtriya Rajkaran (Bharat Ani Jag) Antarrashtriya Sanghatna

भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय राजकारण (भारत आणि जग) आंतरराष्ट्रीय संघटना

प्रा. व्ही. बी. पाटील , के’सागर, विजय नाईक (ज्येष्ठ पत्रकार, आंतरराष्ट्रीय संबंध), डॉ. हर्षवर्धन यादव , प्रियांका गाडे.

K’ सागरीय…

सन २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात व परीक्षापद्धतीत Drastic म्हणावा असा बदल; किंबहुना, सुधारणा झाल्या आहेत, परीक्षेची व्याप्ती व सखोलता वाढली असून आपल्या पेपरचे स्वरूपही वर्णनात्मक (Descriptive) झाले आहे. मराठी, इंग्रजी व निबंध या ३ पेपरसह आता आपणांस सामान्य अध्ययनाच्या ४ पेपर्सचा व वैकल्पिक विषयाच्या २ पेपर्सचा अशा एकूण ९ पेपर्सचा सामना करावा लागणार आहे. एवम्, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या व केंद्र लोकसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात व परीक्षा पद्धतीत आता समानता आली आहे. एकाच वेळी या दोन्ही परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल.

सन १९८६ किंवा त्या पूर्वीपासून सन २०११-१२ पर्यंत राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाचीच होती.

केंद्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा आजही वर्णनात्मक स्वरूपाचीच आहे. अशा परीक्षां साठी पुस्तके संरचित करण्याशी प्रकाशन गेली जवळ जवळ ४० वर्षेसंलग्न असून डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे के’सागर असे एक समीकरण रूढ झाले आहे.

प्रकाशनाच्या या प्रदीर्घ अन् यशस्वी अनुभवातून राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय

संबंध पेपर-२ (विषय सांकेतांक १०५०) मधील भाग-२ भारत आणि जग याच्या अभ्यास क्रमानुसार प्रस्तुतच्या संदर्भाची रचना केली असून तो सामान्य अध्ययन पेपर-२ भारांश आंतरराष्ट्रीय संबंध यासाठीही उपयुक्त ठरेल, असे प्रकर्षाने पाहिले आहे.

के’सागर परिवारातील प्रा. व्ही. बी. पाटील यांच्यासारख्या राज्यशास्त्र या विषयातील गाढ़या व्यासंगी व अभ्यासू सुहृदाच्या सहयोगातून व बहुमोल योगदानातून प्रस्तुतचा संदर्भ साकारला

आहे. या ग्रंथाच्या यशाचे श्रेय निर्विवादपणे प्रा. पाटील यांच्या व्यासंगी लेखणीच्या सहज आविष्कारासच द्यावे लागेल,

या ग्रंथाच्या लेखनकार्यात डॉ. हर्षवर्धन यादव या माझ्या तरुण, अभ्यासू अन् व्यासंगी लेखक मित्राची साथही मला लाभली आहे. प्रियंका गाडे या नव्या उमेदीच्या लेखिकेनेही तिच्यावर सोपविलेल्या भागाचे लेखन उत्तम प्रकारे केले आहे.

या पुस्तकातील ८ वा विभाग ‘काही ज्वलंत विषय (भारताच्या संदर्भात)’ आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक व दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांच्या व्यासंगातून साकारला आहे.

माझे ज्येष्ठ स्नेही प्रा. व्ही. बी. पाटील यांच्या मूळ लेखनाच्या मजबूत पायावर प्रस्तुत संदर्भाची आठ मजली इमारत उभी राहिली आहे. माझ्या या चारही लेखक स्नेह्यांनी या ग्रंथाच्या लेखनकार्यात घेतलेले परिश्रम, त्यांचा प्रदीर्घ अभ्यास अन् अव्याहत व्यासंग यांचा प्रत्यय आपणास पुस्तकाच्या पानापानांतून अन् ठायी ठायी आल्याशिवाय राहत नाही.

जास्तीत जास्त परीक्षाभिमुख रचनाः पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्या प्रकरणांना किती महत्त्व दिले गेले आहे, हे विचारात घेऊन त्या त्या प्रकरणाला दिले गेलेले महत्त्व; महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या गाभ्याशी स्थिरावणारी प्रकरणरचना व नेहमीची साधी-सोपी के सागरीय भाषाशैली ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये माझ्या विद्यार्थिमित्रांना निश्चितच भावतील, यात शंकाच नाही.

आपलाच,

व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.