Bharatiya Varasa Aani Sanskruti Va Itihas भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास Sushil Ahirrao Ksagar

Original price was: ₹195.00.Current price is: ₹146.00.

Author        :        Sushil Ahirrao

Edition        :        2025

Language  ‏  :       Marathi

Publisher  ‎  :      K’sagar Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Bharatiya Varasa Aani Sanskruti Va Itihas भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास

२०१३ ते २४ UPSC प्रश्नपत्रिका घटकनिहाय व उत्तरांसह

Sushil Ahirrao

के’ सागरीय

या वर्षीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यास-क्रमात मूलभूत सुधारणा झाल्या असून हा अभ्यासक्रम आता बव्हंशी केंद्र लोकसेवा परीक्षेप्रमाणेच राहणार आहे. यापूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपातच होत होती; ती आता परंपरागत वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा बदल खूपच मोठा म्हणजे अगदी Drastic म्हणावा असा वाटतो. नवीन अभ्यासक्रमानुसार मराठीत पुस्तके नाहीत; असे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते किंवा तसा समज पसरलेला आहे. खरे तर, या नव्या अभ्यासक्रमानुसार बहुतेक विषयांवर के सागर प्रकाशनाने संदर्भ ग्रंथ प्रकाशित केले असून उर्वरित विषयांवर संदर्भ प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रस्तुतचा संदर्भ सामान्य अध्ययन-१ भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या भारांशासह या पेपरमधील भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास या घटकाच्या अभ्यासक्रमावर आधारित असून संदर्भाची रचना यूपीएससीने २०१३ ते २०२४ या कालावधीत केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सामान्य अध्ययन-१ या पेपरमध्ये उपरोक्त घटकांवर विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे अशी केली आहे. उपरोक्त प्रश्नपत्रिकांमधील सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे घटकनिहाय दिली आहेत.

महाराष्ट्र व केंद्र लोकसेवा आयोगांच्या स्पर्धात्मक अशा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अध्यापन करीत असूनही ज्यांची अध्ययनाशी अद्यापिही नाळ जुळलेली आहे असे तरुण, अभ्यासू व व्यासंगी लेखक सुशिल अहिरराव यांच्या लेखनातून प्रस्तुतचा दर्जेदार तरीही परीक्षाभिमुख असा संदर्भ साकारला आहे. अहिरराव यांनी घटकनिहाय प्रश्न व त्यांची उत्तरे देतानाच वरील विषयही आपणास सर्वांगांनी समजावून दिला आहे. अहिररावांची भाषा साधी-सोपी अन् सर्वांना समजेलशी आहे.

संबंधित घटकास पुरेपूर न्याय देणारा हा संदर्भआपणास आपल्या परीक्षेत उत्तम यश मिळवून देईल, या खात्रीसह आपल्या हाती सोपवीत आहे.

शुभेच्छापूर्वक !

आपला, व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)

 

Best Book For MPSC, UPSC Mains G. S Paper-1 (Paperset )

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.