Bharatiy Rajyaghatana Rashtrachi Konshila-Granville Austin (भारतीय राज्यघटना) Diamond
₹699.00 Original price was: ₹699.00.₹559.00Current price is: ₹559.00.
Author : Granville Austin
Edition : 2026
Language : Marathi
ISBN : 9788184835120
Publisher : Diamond Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Bharatiy Rajyaghatana Rashtrachi Konshila-Granville Austin (भारतीय राज्यघटना) Diamond
प्रस्तावना
(ऑक्सफर्ड इंडिया पेपरबॅक आवृत्ती, १९९९ साठी लिहिलेली)
भारतीय समाजधुरीणांनी राज्यघटनेमध्ये राष्ट्राची आदर्श तत्त्वे तर प्रस्थापित केलीच; आणि शिवाय ती साध्य करण्यासाठी संस्था आणि त्यांच्या कार्यपद्धतींचीही रचना केली. ही रचना करताना, राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता आणि न्याय्य व लोकशाहीधारित समाजनिर्मिती ही राष्ट्राची ध्येये समोर होती. असा नवीन समाज, घटनेमध्ये अंतर्भत असलेल्या लोकशाहीच्या प्रेरणेतून निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक क्रांतीतून घडवायचा होता. तसेच एकात्मता, सामाजिक क्रांती आणि लोकशाही या तीन धाग्यांच्या एकसंध विणीतून तो घडणार होता. ही सर्व उद्दिष्टे परस्परावलंबी आहेत आणि ती एकत्रितपणेच साध्य करता येतील असा या समाजधुरीणांचा ठाम विश्वास होता. यांतील एकेका उद्दिष्टाचा स्वतंत्ररीत्या पाठपुरावा करण्याची आवश्यकता नाही आणि ती वेगवेगळी साध्य करता येणार नाहीत, असे त्यांचे मत होते.
अलिकडच्या काही वर्षांमध्ये संस्थापक नेते आणि त्यांनी केलेली घटना याबद्दल उपहास प्रदर्शित करण्याचा एक प्रवाह काही नागरिकांमध्ये दिसून येतो. १९५० पासून ज्या घडामोडी होत आल्या आहेत त्यामुळे निराश झालेल्या काही लोकांना घटना यशस्वीरीत्या काम करत नाही म्हणून ती बदलावी असे वाटते आहे. माझ्या दृष्टीने असा विचार करणे चुकीचे आहे. घटना आपोआप काम करत नसते; तर नागरिक आणि निवडून दिलेले व नेमलेले नेते ती प्रत्यक्षात राबवत असतात.
मागच्या पन्नास वर्षांचा मागोवा घेतल्यावर, घटनाकारांची राष्ट्रीय ध्येयांची स्पष्टता आणि ती साध्य करण्यासाठी त्यांनी केलेली रचनात्मक सिद्धता किती यशस्वी ठरली आहे, हे मला प्रकर्षाने जाणवले. घटनेने राष्ट्रासाठी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, यात शंका नाही. पुढे अचानकपणे निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे ते त्यावेळी दूरदृष्टीने पाहू शकले नव्हते आणि खरे म्हणजे तशी अपेक्षाही करता येणार नाही.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.