Mahamaya Nilavanti (महामाया निळावंती)-Sumedh
मनोगत
मराठीमध्ये शेकडो ऐतिहासिक कादंबऱ्यांची निर्मिती झाली आहे; त्यात आपल्याही समिधा अर्पू या असा हेतू बिलकुल नव्हता. भारतीय ऐतिहासिक साहित्य दर्जेदार आहे. कित्येक श्रेष्ठ कादंबऱ्या ह्या प्रकारात लिहिल्या गेल्या आहेत. अद्भुत व ऐतिहासिक कादंबऱ्या तर माझ्या सर्वाधिक आवडत्या.
ह्या प्रकारातल्या बऱ्याच कादंबऱ्या वाचल्यानंतर मला त्याच्यात तोचतोचपणा जाणवू लागला. प्रत्येक कादंबरीची गोष्ट वेगळी होती. पण एकसुरीपणा कशामुळे वाटतोय हे मात्र लक्षात येत नव्हतं. ‘स्वयंभूपणा’चा स्वाद ह्या कादंबऱ्यांतून मिळत नव्हता, जो समकालीन आणि उत्तरकालीन नवकथांना होता. क्लासिक म्हणवल्या जाणाऱ्या कादंबऱ्यादेखील एकसारख्याच साच्यातून काढलेल्या वाटत होत्या. ह्यांची कथासूत्रे सारखीच का वाटत आहेत हे शोधायचं ठरवलं. त्यासाठी ‘श्रेष्ठ’ हा दर्जा लाभलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांचा लसावि काढला. तेव्हा कारण लक्षात आलं.
कारण हे आहे की, आपल्या समस्त ऐतिहासिक कादंबऱ्या नायकप्रधान आहेत. आपण नायकाला अवतारी हिरोच बनवून सोडतो. ऐतिहासिक गोष्टींतला नायक एखादा सामान्य माणूस कधीच नसतो. कारण सामान्य माणसांचा उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजांत नसतोच मुळी. इतिहास लिहिला जाताना फक्त जीत आणि पराजित ह्यांचीच भारतीय नोंद ठेवतात, अन सामान्य प्रजेच्या अस्तित्वाकडेच दुर्लक्ष करतात. इतिहास हा राजेमहाराजे आणि त्यांच्या लढायांचाच असतो अशी आपली अजूनही समजूत आहे. परंतु एखाद्या सम्राटाच्या गोष्टीपेक्षा त्याच्या राज्यातल्या सामान्य धोब्याचं, शिंप्याचं, दासीचं, गुलामाचं किंवा एखाद्या प्राण्याचं आयुष्यही जास्त रसाळ असू शकतंच की. मग एखादा सामान्य माणूस कादंबरीचा नायक का असू नये हा प्रश्न खूप वर्षांपासून पडायचा. कोणी लेखक असा विचार का करत नसेल ? एखाद्या लेखकाने असं रंजक कथासूत्र असलेलं पुस्तक लिहून टाकायला पाहिजे असं नेहमी वाटायचं. मग संधी चालून आल्यावर आपणच हे काम करून बघू असं ठरलं.
एक सामान्य लोहार आणि भारतवर्षातला पहिला चक्रवर्ती सम्राट अजातशत्रू ह्यांना केंद्रभागी ठेवून अजातशत्रू ही कादंबरी उभी राहिली. सात वर्षांपूर्वी ही कथा
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.