Adhunik Bharatacha Itihas Bhag 1 Samadhan Mahajan UPSC-MPSC SM Publication
Adhunik Bharatacha Itihas Bhag 1 Samadhan Mahajan UPSC-MPSC SM Publication Original price was: ₹450.00.Current price is: ₹315.00.
Back to products
Dnyanraaj Marathi Vyakaran (द्यानराज मराठी व्याकरण)- Dnyaneshwar Aghav
Dnyanraaj Marathi Vyakaran (द्यानराज मराठी व्याकरण)- Dnyaneshwar Aghav Original price was: ₹390.00.Current price is: ₹273.00.

Adhunik Maharashtracha Itihas va Samajsudharak Bhag – 2-Samadhan Mahajan UPSC-MPSC SM Publication

Original price was: ₹450.00.Current price is: ₹315.00.

Author       :   Samadhan Mahajan

Edition       :   11 ED  ( 2026 )

ISBN           :    9788199076648

Language ‏  :  Marathi

Publisher: ‎ : SM Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Adhunik Maharashtracha Itihas va Samajsudharak Bhag – 2-Samadhan Mahajan UPSC-MPSC SM Publication

मनोगत

विदयार्थी मित्रांनो,

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाजसुधारक या पुस्तकाची अकरावी आवृत्ती आपल्या हाती देतांना आनंद आहे सोबतच जबाबदारी देखील आहे. गेल्या दहा-अकरा वर्षांहून अधिक काळ विद्यार्थी मित्रांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकाला दिला व इतिहासाचे वन स्टॉप सोलुशन बनविले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !

आता या नवीन वर्षात अनेक नवीन आवाहन व प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे.

परीक्षा पद्धतीत होत असलेल्या मोठ्या बदलामुळे आपल्याला अभ्यास प्रक्रियेत देखील बदल करावा लागणार आहे. प्रशासनात देखील दिवसागणिक बदल होत असतात व त्या प्रमाणे विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना तो बदल आत्मसात करावाच लागतो. आपण परीक्षार्थी असतांना परीक्षा पॅटर्न, प्रश्नांच्या पद्धतीत बदल, प्रश्न पत्रिकेत बदल, वेळापत्रकात बदल या समस्यांचा सामना करावाच लागतो. एक अथनि भावी प्रशासकीय अधिकाऱ्याची मानसिकता घडविण्यात या बाबी नकळत हातभार लावत असतात.

असो, आता आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल लक्षात घेता व एकूणच अलीकडील आयोगाच्या प्रश्न पत्रिकांतील बदल लक्षात घेता आपल्या पुस्तकाची देखील रचना बदलण्यात आली आहे. पूर्वी आधुनिक भारताचा इतिहास या आपल्या एकच पुस्तकात महाराष्ट्राचा इतिहास, सांस्कृतिक इतिहास व स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास अशा अनेक घटकांचा अंतर्भाव होता.

दहाव्या आवृत्तीपासून आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाजसुधारक आणि आधुनिक भारताचा इतिहास अशी दोन पुस्तके तयार करण्यात आली आहेत. यामुळे पुस्तकची रचना सुटसुटीत झाली आहे. ज्यांना केवळ महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा आहे त्यांना हे वेगळे पुस्तक आहे व भारताच्या इतिहाचे टॉपीक हे भारताच्या इतिहासाच्या पुस्तकात आहेत.

असे करतांना पहिल्या इतकाच दर्जेदार कंटेंट दोन्ही पुस्तकात आहे. उलट या नवीन आवृत्तीत त्यात अधिक भर घालण्यात आली आहे. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या पुस्तकात समाजसुधारक देखील आहेत. त्यामुळे नव्याने परत वेगळे पुस्तक समाजसुधारकांसाठी वाचण्याची तसदी आपणास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मला खात्री आहे कि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाजसुधारक या पुस्तकात आपल्याला परीक्षाभिमुख दर्जेदार माहिती देण्यात आलेली आहे.

पुस्तकाची रचना करतांना नेहमी प्रमाणे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त राहील याची काळजी घेण्यात आली आहे. हे पुस्तक आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी योगदान देणाऱ्या एस.एम पब्लिकेशनच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार. भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना अगणित शुभेच्छा !

पुस्तकाबद्दल आपल्या काही सूचना व सुधारणा असल्यास नक्की कळवा.

समाधान महाजन

(राज्यकर उपायुक्त)

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.