

Adhunik Bharatacha Itihas -B. L. Grover आधुनिक भारताचा इतिहास
₹699.00 Original price was: ₹699.00.₹524.00Current price is: ₹524.00.
Author : B L Grover & N K Belhekar
Edition : 2025
ISBN : 9789355014511
Language : Marathi
Publisher: : S.Chand Publishing
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Adhunik Bharatacha Itihas -B. L. Grover आधुनिक भारताचा इतिहास
विसाव्या शतकाच्या अखेरीस भारतापुढे निर्माण झालेली आर्थिक, सामाजिक व राजकीय आव्हाने आणि उभ्या ठाकलेल्या अठीसंख्य समस्या मुळातून समजावून घेण्यासाठी अठराव्या व एकोणीसाव्या शतकांतील भारताच्या इतिहासाचा सांगोपांग व सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. या इतिहासाची मुळे अठराव्या शतकाच्या आरंभी मुगल साम्राज्याचे पतन व विघटन होण्यास सुरुवात झाली तेथपर्यंत जाऊन पोचतात. इ.स. १७०७ साली मोगलसम्राट औरंगजेब याचा मृत्यू झाला ही घटना आधुनिक भारताच्या इतिहासाचा व पुढील काळांतील सर्वगामी व दूरगामी परिवर्तनाचा आरंभबिंदू आहे. या परिवर्तनाचे स्वरूप तोपर्यंत पुरेसे स्पष्ट झालेले होते म्हणून १९६४ साली झालेले पंडित नेहरूंचे निधन ही या इतिहासक्रमातील शेवटची घटना ठरते. या दोनशे वर्षात झालेले हे परिवर्तन केवळ राजकीय स्वरूपाचे नव्हते तर सामाजिक व आर्थिकही होते. राजकीय स्थित्यंतर हे त्याचे मूळ आहे. या राजकीय स्थित्यंतरांमागची कारणे, त्यांचा घटनाक्रम व त्यांचे परिणाम जाणून घेतल्याशिवाय त्यायोगे घडलेल्या मूलगामी परिवर्तनाचे स्वरूप लक्षात येत नाही. हे परिवर्तन पूर्णपणे समजावून घेणे हे आजच्या काळातील प्रत्येक सुशिक्षिताचे कर्तव्य आहे. त्यासाठी ‘आधुनिक भारताचा इतिहास एक नवीन मूल्यांकन’ यासारखा ग्रंथ उपयुक्त ठरतो.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या गेल्या पन्नास वर्षांत आधुनिक भारताच्या इतिहासाकडे नव्याने पाहाणारी व त्या इतिहासाची नवी दृष्टी देणारी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ही पुस्तके ब्रिटिश वा यूरोपिअन इतिहासकारांप्रमाणे ब्रिटीशांचा भारतावरील विजय वा त्यांची राजनीतिकुशलता यावर केवळ भर देणारी नसून भारतीयांच्या ब्रिटीशांनी केलेल्या पराभवाची मीमांसा करणारी आहेत. ब्रिटिशांनी एका लहानशा व्यापारी कंपनीच्या रूपाने भारतात येऊन हातपाय पसरल्यानंतर भारताचे जे सर्वांगीण शोषण केले त्यासंबंधीचे भान स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतीयांमध्ये कसे निर्माण झाले व त्यांच्या जागृतीचे एका महान स्वातंत्र्यसंगरात कसे रूपांतर झाले या वस्तुस्थितीवर ही पुस्तके प्रकाश टाकतात.
ब्रिटिशांचा भारतात प्रवेश झाल्यानंतर भारतातील हिंदू-मुस्लिम व ब्रिटिश यांचे परस्पर संबंध कसे होते. ब्रिटिशसत्तेला भारतीयांचा प्रारंभापासून विरोध कसा होता ब्रिटिशांची कुटिल राजनीती व सर्व पातळ्यांवर देश पोखरून टाकण्याचे त्यांचे राजकीय धोरण कसे होते. इंग्रजविरोधी उठाव कसे सुरू झाले. भारतीयांना आत्मपरीक्षण का करावेसे वाटू लागले व येथल्या रूढ सामाजिक चौकटीला विरोध त्यांनी कसा केला, या संदर्भात वृत्तपत्रांनी कशाप्रकारची कामगिरी बजावली इत्यादी अनेक प्रश्नांचा ऊहापोह आधुनिक इतिहासकारांनी केलेला आहे. राष्ट्रवाद, हिंदू-मुस्लिम यांच्यातील तेढ, फाळणीचे परिणाम, भारताची आर्थिक स्थिती व तिची कारणमीमांसा अशा अनेक गोष्टींचे विश्लेषण करण्याची आधुनिक इतिहासकारांची प्रवृत्ती आहे.
‘आधुनिक भारताचा इतिहास, एक नवीन मूल्यांकन’ हा ग्रंथही याच स्वरूपाचा आहे. या ग्रंथात गेल्या दोनशे वर्षाच्या काळातील महत्त्वपूर्ण अशा ऐतिहासिक घटनांचा क्रमवार वेध घेऊन त्यासंबंधीचे विश्लेषणही करण्यात आलेले आहे. विवेचनाच्या ओघात या काळातील सर्व महत्त्वाच्या इतिहासकारांच्या मतांची पुष्टी देत वा त्यासंबंधी असणाऱ्या परस्परविरोधी मुद्यांचीही वाचकांना माहिती देत लेखकाने भरपूर संदर्भ पुरवले आहेत. मध्ययुगातून आधुनिक काळात प्रवेश करणाऱ्या भारताच्या इतिहासाचे महत्वाचे टप्पे समजावून घेतल्याशिवाय देशाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक सद्य स्थितीचे मान देते अतिहारसाहे याची आवश्यकता ध्यानात घेऊन सामान्य नागरिक महाविद्यालयीन व लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थीना उपयुक ठरेल असा ग्रंथ लेखकाने सिद्ध केला आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.