Adarsh Nibandhmala Marathi UPSC MPSC Ajit Deshmukh (Essay) Amogh Academy
₹350.00 Original price was: ₹350.00.₹228.00Current price is: ₹228.00.
Author : Ajit Deshmukh
Edition : 1 ed 2026
ISBN :
Language : Marathi
Publisher : Amogh Academy
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Adarsh Nibandhmala Marathi UPSC MPSC Ajit Deshmukh (Essay) Amogh Academy
प्रस्तावना
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
स्पर्धा परीक्षांचा प्रवास हा धैर्य, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न आणि योग्य दिशादर्शन यांच्या संगमातून घडणारा एक विलक्षण प्रवास आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) सारख्या परीक्षांकडे लाखो युवक-युवती आशेने आणि आत्मविश्वासाने पाहतात. या विद्यार्थ्यांची खरी कसोटी लागते पूर्व परीक्षेचा (Prelims) टप्पा पार केल्यानंतर मुख्य परीक्षेत लेखन कौशल्याची कसोटी पाहणाऱ्या या टप्प्यावर विद्यार्थ्यांना स्व-आविष्काराची सर्वाधिक संधी देणारा आणि सर्वाधिक गुण मिळवून देणारा पेपर म्हणजे निबंधाचा पेपर. या पेपरला खऱ्या अथनि ‘रैंक चेंजर किंवा गेम चेंजर’ म्हणतात, कारण अनेक वर्षांच्या निकालावरून हे स्पष्ट होते की, ज्या विद्यार्थ्यांनी निबंधात उत्कृष्ट गुण मिळवले, तेच विद्यार्थी अंतिम यादीत शीर्षस्थानी पोहोचले आहेत. सामान्य अध्ययनाच्या पेपर्समध्ये गुण मिळवण्यास एक टप्प्यानंतर मर्यादा येते, पण निबंध हा असा विषय आहे ज्यात विद्यार्थी आपली विचारशक्ती, विश्लेषण, मांडणी, व्यक्तित्व, वाचन, अभिव्यक्ती आणि भाषाशैलीच्या जोरावा सहज 20-30 गुणांची आघाडी घेऊ शकतो. हीच आघाडी अंतिम निवड यादीत आपले नाव येणार की नाही किंवा आपल्याला हवी ती पोस्ट मिळणार की नाही यातला फरक निर्माण करते.
अनेक विद्यार्थ्यांच्या मनात निबंधाचा अभ्यास करणे म्हणजे काय याविषयी गोंधळ असतो. ‘नेमके सुरू कसे करायचे?’, ‘निबंधाच्या विषयाची दिशा कोणती?’, ‘विचार नेमके कसे मांडायचे?’, ‘तथ्य आणि तत्त्वज्ञान; माहिती आणि शैली यात समतोल कसा राखायचा?’ किंवा ‘सामान्य अध्ययन आधारित आणि तात्त्विक (philosophical) निबंधातील फरक नेमका काय?’ अश असंख्य प्रश्नांमुळे बहुतांश विद्यार्थी मुख्य परीक्षेच्या अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात निबंधलेखनाकडे वळतात आणि हीच मोगूं चूक त्यांच्या गुणांवर नकारात्मक परिणाम करते. कारण पुरेशी तयारी केल्याशिवाय १०००-१२०० शब्दांचा उत्तम निबंध लिहितं अशक्य आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या नेमक्या अडचणी ओळखून, त्यांना टप्प्याटप्याने निबंधलेखनाचे संपूर्ण मार्गदर्शन देण्यासाठी तयार केले आहे. हे पुस्तक केवळ माहिती देणारे नसून, निबंधलेखनाला ‘कला शास्त्र’ असे स्वरूप देणारे एक मार्गदर्शक स्वरूपाचे पुस्तक आहे.
या पुस्तकाची रचना पूर्णपणे परीक्षा पद्धतीच्या मागणीनुसार आणि विद्यार्थीस्नेही दृष्टीकोनातून केली आहे. पुस्तकाच्या पहिल्या विभागात निबंधलेखनाबद्दल सैद्धांतिक माहिती सुलभ भाषेत मांडली आहे. विषय समजून घेणे (decoding the topic), दिलेल्या वेळेचे नियोजन कसे करावे, विचारांना सुसंगत रूप देण्यासाठी विचारमंथन / ब्रेनस्टॉर्मिंग कसे करावे, निबंधाची संरचना (structure) कशी असावी, परिच्छेदांचे भान राखणे आणि ते प्रवाहीपणे कसे जोडावे, उदाहरणांचे प्रकार कोणते या सर्व बाबीच चर्चा या विभागात आहे. निबंधलेखन ही नैसर्गिक प्रतिभा नसून योग्य मार्गदर्शनाने विकसित होणारे कौशल्य आहे, हे विद्यार्थार इथे उमगेल.
यानंतर पुस्तकाचा मुख्य आधारस्तंभ असलेले १०१ नमुना निबंध दिले आहेत. विविध विषयांवरील हे निबंध विद्यार्थ्यांन विचारांची खोली, शब्दनिवड, तर्कशक्ती आणि संतुलित मांडणी शिकवतात. यात सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक, पर्यावरणीम सांस्कृतिक अशा सर्व समकालीन विषयांसोबतच ‘अमूर्त’ किंवा तात्त्विक प्रकारातील अनेक महत्त्वाचे विषय समाविष्ट केले आहे त्या-त्या विषयांसाठी पूरक परिभाषा आत्मसात करून हे निबंध लिहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक निबंध वेगळा आहे. आजच बदलत्या पॅटर्नमध्ये तात्त्विक विषयांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि विद्यार्थ्यांना त्याची सवय नसल्याने ते घाबरतात. मा या पुस्तकातील नमुना निबंध वाचल्यानंतर, तात्त्विक विचार कसे सोप्या भाषेत आणि ठोस उदाहरणांच्या आधारे मांडता येतात
विद्याध्यर्थ्यांना स्पष्टपणे समजेल. अमूर्त विषयांना मूर्त उदाहरणांची जोड कशी द्यायची हे कौशल्य विद्यार्थ्यांच्या ठायी विकसित होईल. विद्याच्यांची अजून एक मोठी अडचण म्हणजे ‘मी पूर्ण निबंध तर लिहू शकत नाही, पण दिशा मिळाली तर नक्की लिवू
शकतो!’ हीच गरज ओळखून या पुस्तकात २०० हून अधिक निबंध संरचना आणि सरावासाठी विषय दिले आहेत. या संरचना म्हणजे निबंधाचे सांगाडे आहेत. या आराखड्यांच्या आधारे विचारांची मांडणी करून विद्यार्थी सहजपणे उत्तम निबंध लिहू शकतो. ‘सुरुवात कशी करावी?’, ‘विषय कोणत्या दृष्टीकोनातून पाहावा?’, ‘कोणते पैलू अनिवार्य आहेत?’, ‘उदाहरणे, केस स्टडीज, सरकारच्या योजना, तात्विक भाग यांची लेखन योजना कशी करावी?’ अशा प्रश्नांची उत्तरे या संरचनेच्या माध्यमातून मिळतात स्पर्धा परीक्षांमध्ये वेळेच्या मयदिमध्ये उत्तम निबंध लिहिण्यासाठी हा विभाग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी १०० हून अधिक नमुना विषय दिले आहेत. या विषयांचा आराखडा बनविणे किंवा लेखन सराव करणे यासाठी उपयोग होईल. निबंध आकर्षक बनवण्यासाठी उक्ती/कोटस्, सुविचार, म्हणी, संवाद, सुभाषिते, उपमा आणि तत्वज्ञानाची जोड ही अत्यंत महत्त्वाची असते. योग्य ठिकाणी वापरलेल्या उक्तीमुळे किंवा सुभाषितामुळे निबंधाला एकदम वेगळे वजन प्राप्न होते, तो प्रभावी बनतो. म्हणूनच या पुस्तकात दिलेले ५५५ उक्ती/सुविचार, म्हणी, संवाद, सुभाषिते आणि तात्विक ओळी विद्यार्थ्यांच्या लेखनाला नक्कीच प्रभावी बनवतील. सामान्य अध्ययन आधारित निबंधातही आणि तात्विक निबंधातही हे सुविचार सहज वाता येतात. यामुळे लेखनाच्या दर्जात वाढ होते.
या पुस्तकाचा उद्देश फक्त निबंध म्हणजे काय हे शिकवणे नाही, तर निबंध ‘समजावणे’ आहे. सामान्य अध्ययन आधारित निबंधात तथ्य, आकडेवारी, धोरणे, योजनांची चर्चा महत्त्वाची असते, तर तात्विक निबंधात विचारांची सुसूत्रता, उपमा-उदाहरणांचे संतुलन आणि विश्लेषणाची खोली महत्त्वाची ठरते. या दोन्ही प्रकारच्या लेखनासाठी स्वतंत्र मार्गदर्शन या पुस्तकात दिले आहे. ‘अमूर्त’ विषय कसा ठोस चनबाबा किंवा ‘ठोस’ विषयाला कशी तात्विक बैठक द्यावी, याचे तंत्र या पुस्तकात स्पष्ट केले आहे. हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवायचे नसून, ते सतत वापरण्यासाठी जणू एक वर्कबुक म्हणून तयार केले आहे. सुरुवात सैद्धांतिक विभागापासून करावी, नंतर नमुना निबंधांचा अभ्यास करून लेखनशैली समजून घ्यावी, त्यानंतर संरचनेच्या आधारे स्वतः निबंध लिहायचा सराव करावा आणि कोट्सचा संग्रह वाचनात ठेवून आपल्या भाषेला धार द्यावी. आठवड्यातून एक-दोन निबंध लिहून स्वतःच्याच लेखनातील बदल विद्यार्थ्यांना सहजपणे जाणवतील. निबंध हा आरशासारखा असतो. तो तुमच्या विचारांचे आणि व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब दर्शवितो, त्यामुळे फक्त भाषेची आलंकारिक मांडणी नको, तर विचारांची स्पष्टता आणि भाषेची साधी, सुटसुटीत, प्रभावी लेखनशैली हवी आहे. अवघड विषय सोप्या भाषेत आणि समतोल दृष्टीकोनातून मांडता आला, तर उत्तम निबंध लिहिता येतो.
हे पुस्तक लिहिताना माझी अर्धांगिनी सौ. सरोजा देशमुखची मोलाची मदत झाली. तिच्या पाठबळामुळे कौटुंबिक जबाबदा-यांमध्ये वेळ न जाता हे पुस्तक लिहिणे मला शक्य झाले. तसेच हे पुस्तक लिहिताना श्री. विक्रमसिंह माने-देशमुख (मामा), ज्येष्ठ बंधु अॅड. रणजित देशमुख यांचे पाठबळ आणि माझे अभित्र स्नेही श्री. प्रतिक गंगावणे यांच्याशी झालेल्या चर्चा वेळोवेळी उपयोगी पडल्या. पुस्तक लिहिल्यापासून ते मूर्त रूपात येईपर्यंत ज्या व्यावसायिक बाबी लक्षात घ्याव्या लागतात त्यामध्ये श्री. अभिषेक ठिगळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्री. संतोष कांबळे यांनी अतिशय विक्रमी वेळेत पुस्तक छपाईस जाईल यासाठी मोलाची मदत केली. या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे.
हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. अधिकारी होण्याच्या स्वप्नातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे निबंधाचा पेपर. मला खात्री आहे की या पुस्तकातील लेखनतंत्र, उदाहरणे, नमुना निबंध आणि सुभाषितांचा खजिना तुमच्या लेखनकौशल्याला धार लावेल, निबंधाची भीती दूर करेल आणि मुख्य परीक्षेत उच्च गुण मिळवण्यास तुमची नक्कीच मदत करेल. तुमच्या लेखणीला धार येवो, तुमच्या विचारांना खोली लाभो आणि यशस्वी अधिकारी होण्याच्या प्रवासात हे पुस्तक तुमचा विश्वासू सहकारी ठरो, याच शुभेच्छा !!!
बीर भोग्य वसुंधरा !!!
अजित सुनिता प्रतापराव देशमुख
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Language | Marathi |
|---|---|
| Publication House | Amogh Academy |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.