

Aathavanitle Divas Katha Narendra Chapalgaonkar (Marathi) (novel) (आठवणीतले दिवस)
₹500.00 Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.
Author : Narendra Chapalgaonkar
Edition : 1 ed
Language : Marathi
Publisher : Mouj Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Aathavanitle Divas Katha Narendra Chapalgaonkar
आठवणीतले काही जुने सांगावेसे वाटले तेव्हा पम ‘वाडयातले दिवस’ लिहिले. ‘मौज’ दिवाळी अंकात ते प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक मित्रांनी माझ्या आठवणीबरोबर आलेल्या काळाच्या आठवणी आवडल्याचे सांगितले. मी वाढली त्या भागाच्या-मराठवाडयाच्या बऱ्याशा अपरिचित असणाऱ्या समाजजीवनाबद्दल कुतूहल असणे स्वाभाविक होते. त्यानंतर मी या आठवणी पूर्ण करण्याचे ठरवले पण हे लेखन सलगपणे झालेले नाही. दिवाळी अंकांच्या निमित्तानेच लिहित गेलो. पुढील प्रकरणे ‘पद्यगंधा’, ‘ग्राहकहित’, ‘चतुरंग अन्य’, ‘गोवादूत’, ‘तरुण भारत’ (बेळगाव), ‘तरुण भारत’ (नागपूर) अशा नियतकालिकांच्या दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाली. शेवटचे प्रकरण ‘अंतर्नाद मध्ये प्रसिद्ध झाले. या सर्व नियतकालिकांच्या संपादकांचा-श्रीनिवास विनायक कुलकर्णी, मोनिका गजेंद्रगडकर, अरुण जाखडे, सूर्यकांत पाठक, अविनाश सपे, लक्ष्मणराव जोशी, प्रकाश एदलाबादकर आणि भानू काळे यांचा मी मनपूर्वक आभारी आहे.
पारंभीची बरीच प्रकरणे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी वागून टंकलेखनाचे शोधन करून दिली होती व आपला अभिप्रायही कळवला होता. सुभीर रसाळ यांनी संपूर्णय लेखन वाचून सूचना केल्या. न्या० अभय ओक, राधाकृष्ण मुळी, सुभाषचंद्र वाघोलीकर, शरच्चंद्र पानसे अशा काही स्नेह्यांनी यातील बराचसा भाग वाचून काही सूचना केल्या.
माझे मित्र शेखर गोडबोले यांनी देखणे आणि अन्वर्थक मुखपृष्ठ चित्रित केले. पुस्तकातील छायाचित्रांची मांडणी आणि पारंभीची सजावटही त्यांनीच केली, व्यक्तीची रेखाचित्रे बाळ ठाकूर यांनी व इमारतीची रेखाचित्रे विनायक सुतार यांनी काढलेली आहेत. छायाचित्रे माझ्या कुटुंबीयांनी उपलब्ध करून दिली. तसेच हेमंत उज्वरपे याने एक जुने छायाचित्र मिळवून दिले.
माधव भागवत यांनी माझे हे पुस्तक ‘मौज’च्या इतमामाला व त्यांच्या मजवरच्या स्नेहाला शोभेसे काढले. त्यांचे मनःपूर्वक आभार.
– नरेन्द्र चपळगावकर
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.