Aadhunik Bharatacha Itihaas Plassey Te Phalni (आधुनिक भारताचा इतिहास प्लासी ते फाळणी) MPSC-UPSC-Ranjan Kolambe Bhagirath

Original price was: ₹550.00.Current price is: ₹385.00.

Author       : By Ranjan Kolambe

Edition       : 3 ed (2026)

Language ‏  :  Marathi

Publisher  ‎ : Bhagirath Prakashan / भगीरथ प्रकाशन.

 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Aadhunik Bharatacha Itihaas Plassey Te Phalni (आधुनिक भारताचा इतिहास प्लासी ते फाळणी) MPSC-UPSC-Ranjan Kolambe Bhagirath

प्रस्तावना

प्रस्तावना

भारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेस खूप मोठी पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी पोर्तुगिजांच्या आगमनापासून सुरू होते. 16 व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगिजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपली सत्ता स्थिर केली. त्यानंतर 17 व्या शतकात डच, इंग्रज व फ्रेंच व्यापारी भारतात आले.

त्या वेळी भारतात मुघलांची प्रबळ सत्ता अस्तित्वात होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात युरोपीय व्यापाऱ्यांनी आपले लक्ष व्यापारावरच केंद्रीत केले. सुरुवातीस युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून परवाने मिळवून शांततेने व्यापार करत असत. व्यापाराच्या सोयीसाठी युरोपीयन व्यापारी कंपन्यांनी भारतात वखारी स्थापन केल्या.

मुघल बादशहा औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल सत्तेला उतरती कळा लागली. मुघल साम्राज्याच्या सुभेदारांनी स्वतंत्र्य स्वायत्त राज्ये (Autonomous States) स्थापन केली. उदा. बंगाल, अवध, हैद्राबाद इत्यादी. तसेच मराठा, म्हैसूर, शीख, सिंध ही राज्येही उदयास आली. या राजकीय अस्थिरतेचा फायदा युरोपीय व्यापाऱ्यांनी घेतला.

सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पोर्तुगीज व डच यांना इंग्रजांनी व्यापारी स्पर्धेत मागे टाकले. भारतात व्यापारी मक्तेदारी मिळविण्यासाठी इंग्रज व फ्रेंच यांच्यात मात्र अटीतटीची स्पर्धा होती. पुढे 18 व्या शतकाच्या मध्यावर 1744 ते 1763 दरम्यान इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली. त्यांना ‘कर्नाटक युद्धे’ (Carnatic Wars) म्हणून ओळखले जाते. तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. सत्तास्पर्धेत फ्रेंच नामोहरम झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही.

त्यानंतर इंग्रजांनी आपला मोर्चा भारतीय राज्यांकडे वळविला. मोठ्या योजकतेने व नियोजनाने त्यांनी युद्धे व कुटनितीच्या साहाय्याने 1857 पर्यंत जवळजवळ निम्मा भारत आपल्या प्रत्यक्ष सत्तेखाली आणला. उर्वरित संस्थानिकांनाही आपल्या नियंत्रणाखाली आणले. मुठभर इंग्रजांनी भारतात येऊन भारतीय संसाधनांचाच वापर करून इंग्लंडपेक्षा सुमारे 20 पटीने अधिक क्षेत्रफळाच्या भारतावर सुमारे 150 वर्षे राज्य केले, याला इतिहासकारांनी ‘Romance of History’ असे संबोधले आहे.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.