Operation Sindoor Indrayani Chavan Marathi Book katha-kadambari (Novel) Krishna ऑपरेशन सिंदूर

Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

Author           :   Indrayani Chavan

Edition          :   2025    

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   9789347527463

Publisher      :  Krishna Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Operation Sindoor Indrayani Chavan Marathi Book katha-kadambari (Novel) Krishna ऑपरेशन सिंदूर

उपोद्घात

भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे, तसाच तो ऋषिमुनींचा, संतांचा आणि कलाकारांचा देश आहे; पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे भारत हा वीरांचा-वीरांगनांचा देश आहे. जिथे सुरक्षितता असते, तिथेच समृद्धी नांदते. हजारो वर्षं परकीय आक्रमणं झेलणाऱ्या भारताची समृद्धी जपली गेली, संवर्धित केली गेली ती इथल्या वीरांनी आणि वीरांगनांनी गाजवलेल्या शौर्यामुळे ! भारताला लाभलेली शौर्याची परंपरा फार जुनी आहे.

प्राचीन काळापासून भारतीय कलाकार घडवत असलेल्या शस्त्रधारी देवदेवता आणि त्यांच्याशी जोडलेल्या देव-दानव युद्धाच्या कथा ही अशी प्रतीकं आहेत, जी आपल्याला शौर्याचं स्मरण करून देतात, दुष्टांना दंडित करण्यासाठी सुष्टांनी हाती शस्त्र धारण करावं लागतं हे सांगतात आणि अधर्म दूर करण्यासाठी धर्मयुद्ध अटळ असतं हा संदेश देतात. काळावरही प्रभुत्व गाजवणारा भैरव असो, महाविनाशक रूद्र असो, संरक्षक विष्णू असो की महाप्रतापी माँ दुर्गा ! या देवता आपल्याला अधर्माशी लढायला सांगतात.

‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही दोन महाकाव्य तर भारतीय संस्कृतीच्या विचारांचे साहित्यिक दाखले आहेत. या दोन्ही महाकाव्यांनी ‘भारतीय धर्म’ सविस्तर मांडला आहे. कदाचित, म्हणूनच ‘ऑपरेशन सिंदूर ‘विषयी माहिती देताना राजकीय नेते आणि लष्करी अधिकारी या महाकाव्यांवर आधारित रचनांमधल्या ओळींचा उल्लेख करत होते. भारतीय सेनेनं केलेली कारवाई, भारतीय सांस्कृतिक विचारांच्या आधारानं केलेली आहे, हे जागतिक स्तरावर स्पष्ट करण्याचा हेतू यामागे असावा.

पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगामच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारतानं पाकिस्तानविरुद्ध केलेली लष्करी कारवाई अनेक अर्थानी विशेष ठरली. दहशतवादाविरुद्ध आपली ‘शून्य सहनशीलता’ सिद्ध करताना भारतानं जगाला प्रथमच आपलं आक्रमक रूप दाखवलं; पण त्या आक्रमकतेमध्येही विवेक सांभाळला. धर्मरक्षणासाठी युद्धाची अनिवार्यता समजावणाऱ्या कृष्णाचा आणि युद्धातही विवेक राखणाऱ्या मर्यादा

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.