Nibandhlekhan Ek Paripurna Margadarshak Rakesh Mahadev Akolkar Lokseva
₹340.00 Original price was: ₹340.00.₹238.00Current price is: ₹238.00.
Author : Rakesh Mahadev Akolkar
Edition : 1 ed 2026
ISBN :
Language : Marathi
Publisher : Lokseva Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Nibandhlekhan Ek Paripurna Margadarshak Rakesh Mahadev Akolkar Lokseva
मनोगत
प्रिय अभ्यासक मित्रांनो,
स्पर्धा परीक्षेच्या तयारीत मी स्वतः अनेकदा अनुभवले आहे की निबंध लेखन हा पेपर अनेक विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक गोंधळाचा ठरतो. भरपूर वाचन असूनही योग्य मांडणी करता येत नाही, विचार मनात असूनही कागदावर ओघवतेपणे उत्तरवता येत नाही, किंवा मुद्दे व्यवस्थित जोडले जात नाहीत असे प्रश्न प्रत्येकाला भेडसावतात. या समस्यांचा सामना मीही केला आहे.
तयारीच्या काळात मी स्वतःला वारंवार प्रश्न विचारला –
“आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे?”
“माझे विचार प्रभावीपणे कागदावर कसे मांडता येतील?”
“निबंधात व्यक्तिमत्त्वाचे दर्शन कसे घडवता येईल?”
याच प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत असताना या “निबंध : एक परिपूर्ण मार्गदर्शिका” पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
निबंध हा केवळ माहितीचा साठा नसतो, तर तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. तुमचा विचार किती व्यापक आहे, सामाजिक प्रश्नांकडे किती संवेदनशीलतेने पाहता, घडामोडींवर किती संतुलित दृष्टी ठेवता आणि हे सर्व किती स्पष्टपणे अभिव्यक्त करता हे निबंधातून दिसून येते. म्हणूनच निबंध लेखन हे केवळ ज्ञानापेक्षा अधिक म्हणजे विचार, मूल्ये आणि अभिव्यक्ती यांचा संगम आहे.
हे पुस्तक तयार करताना माझा उद्देश फक्त एकच होता निबंध लेखनाविषयीची भीती दूर करून तुम्हाला आत्मविश्वास देणे. यात मी माझ्या तयारीदरम्यान वापरलेल्या टिप्स, रचना, सुविचार, उदाहरणे, महत्त्वपूर्ण आकडेवारी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विषयांशी निगडित स्वतंत्र दृष्टीकोन विकसित करण्याची तंत्रे दिली आहेत.
पुस्तकात मागील वर्षांचे निवडलेले निबंध व त्यांची विश्लेषणात्मक उत्तरे, सामाजिक, तात्त्विक, पर्यावरणीय आणि समकालीन विषयांवरील प्रातिनिधिक (Model) निबंध, सरावासाठी outlines, तसेच संदर्भासाठी सुविचार, प्रेरणादायी घटना आणि नैतिक गोष्टींचा समावेश आहे. जवळपास 75 नमुना निबंध आणि 35 अपेक्षित निबंध संरचना या पुस्तकात दिल्यामुळे विद्यार्थी स्वतःचा सराव योग्य दिशेने करू शकतील.
माझा विश्वास आहे की हे पुस्तक तुम्हाला विचारांच्या शिस्तीबरोबरच अभिव्यक्तीची ताकदही देईल आणि मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविण्यास मदत होईल. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळावी आणि UPSC/MPSC सारख्या परीक्षेत तुम्ही उज्वल यश संपादन करावे हीच माझी मनापासूनची इच्छा आहे.
हे कार्य एका व्यक्तीचे नसून, सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या पुस्तकाच्या निर्मितीत आप्पा हातनुरे सर, साई डहाळे, आदिनाथ सुरनर, मधूशी अकोलकर, आदित्य अकोलकर, आणि लोकसेवा अकॅडमीच्या संपूर्ण टीमचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या अनुभव, सातत्यपूर्ण पुनरावलोकन आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोनामुळे हे पुस्तक अधिक वास्तववादी, समृद्ध आणि उपयुक्त झाले आहे.
शेवटी, UPSC / MPSC मुख्य परीक्षा ही केवळ स्पर्धा नसून, ती जबाबदार लोकसेवेसाठीच्या मानसिकतेची तयारी आहे. संतुलित विचार, स्पष्ट अभिव्यक्ती, नैतिक अधिष्ठान, सार्वजनिक हिताची जाणीव आणि प्रभावी लेखनशैली हेच या परीक्षेतील खरे यश आहे. हे पुस्तक तुमच्या तयारीचा विश्वासार्ह साथीदार आणि मार्गदर्शक ठरेल, हीच अपेक्षा.
तुमच्या यशस्वी प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! विचार करा, लिहा, आणि यशस्वी व्हा!
आपला,
राकेश महादेव अकोलकर
(IPS)
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.