Back to products
Apatti Vyavasthapan MPSC GS Paper 3 Suhasini Mulik Ghodke-Future
Apatti Vyavasthapan MPSC GS Paper 3 Suhasini Mulik Ghodke-Future Original price was: ₹150.00.Current price is: ₹105.00.

MPSC Mains Samanya Adhyayan I,II,III,IV Uttarlekhan Kala UPSC Previous Solved Papers 1,2,,3,4 Art Of Answer Writing-Rakesh Mahadev Akolkar Lokseva

Original price was: ₹660.00.Current price is: ₹462.00.

Author        :   Rakesh Mahadev Akolkar

ISBN            :    

Language  ‏ :     Marathi

Publisher  ‎ :    Lokseva Publication 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

MPSC Mains Samanya Adhyayan I,II,III,IV Uttarlekhan Kala UPSC Previous Solved Papers 1,2,,3,4 Art Of Answer Writing-Rakesh Mahadev Akolkar Lokseva

प्रस्तावना

नागरी सेवा परीक्षा ही केवळ पाठांतराबर आधारित ज्ञानाची परीक्षा नाही; ती उमेदवाराच्या बौद्धिक परिपक्वतेची, विचारशक्तीची, विश्लेषण क्षमतेची मान्यवृष्टीची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लेखनकौशल्याची कसोटी आहे. ही परीक्षा उमेदवार किती वाचतो यापेक्षा, तो जे चाचतो ते फसे समजतो, कसे विश्लेषित करतो आणि कसे मांडतो याची चाचणी घेते. म्हणूनच असे म्हटले जाते की-

“Examinations do not test how much you know; they test how well you can express what you know.”

UPSC / MPSC नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. यांपैकी मुख्य परीक्षा (Mains) हा सर्वात निर्णायक टप्पा आहे. निबंध, सामान्य अध्ययनाचे चार पेपर्स आणि ऐच्छिक विषयाचे दोन पेपर्स मिळून एकूण 7 पेपर्समधील गुणच अंतिम क्रमवारी निश्चित करतात. पूर्वपरीक्षा ही वेग, अचूकता आणि तथ्यात्मक माहितीवर आधारित पात्रता परीक्षा असते; मात्र मुख्य परीक्षा ही उमेदवाराची सखोल समज, बहुआयामी दृष्टिकोन, तार्किक मांडणी आणि उत्तरलेखन कौशल्याची अंतिम कसोटी असते.

मुख्य परीक्षेचा subjective pattern हे स्वतः मध्येच एक मोठे आव्हान आहे. प्रत्येक प्रश्न साधारणपणे १५० ते २५० शब्दांत, ठरावीक वेळेत लिहावा लागतो. मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप प्रश्न थेट माहितीवर आधारित नसून अत्यंत वैविध्यपूर्ण असते लघुउत्तरे, दीर्घ उत्तरे, निबंध, केस स्टडीज, विश्लेषणात्मक, मतप्रधान, तुलना आधारित किंवा केस-स्टडी स्वरूपाचे प्रश्न असतात. या सर्व प्रश्नांसाठी केवळ विषयज्ञान पुरेसे नसून, उत्तराची योग्य रचना, प्रश्नाची अचूक मागणी समजून घेण्याची क्षमता, मुद्देसूदपणा, तार्किक मांडणी, उदाहरणांचा योग्य वापर, सादरीकरणातील स्पष्टता आणि वेळेत संतुलित उत्तर लिहिण्याची क्षमता आवश्यक असते.

अनेक उमेदवार प्रचंड अभ्यास करूनही अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे उत्तरलेखनाची ही कला विकसित झालेली नसते. येथेच ज्ञान आणि गुण बांमध्ये अंतर निर्माण होते. म्हणूनच Prelims पास होणे हे केवळ मुख्य परीक्षेचे दार उघडते, तर मुख्य परीक्षेतील उत्कृष्ट लेखनच अंतिम यश निश्चित करते.

उत्तरलेखनातील उत्कृष्टता एका दिवसात मिळत नाही; ती सातत्यपूर्ण, नियोजित सरावातूनच विकसित होते.

याच वास्तवातून “Art of Answer Writing and Previous Years Solved Question Answers for UPSC/MPSC Mains Exam” या पुस्तकाची संकल्पना जन्माला आली आहे. या पुस्तकाचा उ‌द्देश उमेदवारांना काय बाचावे यापेक्षा कसे लिहावे हे शिकवणे हा आहे. हे पुस्तक उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या उत्तरलेखन कौशल्याचे शास्त्रशुद्ध व व्यावहारिक मार्गदर्शन करते.

या पुस्तकाचे वैशिष्ठो उत्तरलेखन ही केवळ कौशल्य नसून एक शिस्तबद्ध प्रक्रिया आणि कला (Art) आहे, हे स्पष्टपणे समजावून सांगणे. प्रश्नातील Directive Words जसे की Discuss, Examine, Critically Analyze, Evaluate यांचे महत्त्व समजावून प्रश्नाची अचूक मागणी (Decoding the Demand of the Question) कशी ओळखावी, हे टप्प्याटप्प्याने स्पष्ट करण्यात आले आहे. विविध प्रकारची प्रस्तावना व निष्कर्ष कसे लिहावेत, उत्तराचा मुख्य भाग बहुआयामी कसा करावा, मूल्यवर्धन (Value Addition) कसे करावे, स्वतःचे उत्तर कसे तपासावे या सर्व बाबींवर सविस्तर मार्गदर्शन दिले आहे.

अभ्यासक्रमाची समज, प्रश्नांचे प्रकार, वेळ व जागेचे नियोजन, रिव्हिजन शेडयुल, मॉक टेस्ट्सचे महत्त्व, मानसिक तयारी आणि परीक्षागृहातील रणनीती यांवरही विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे ही पुस्तिका केवळ संदर्भग्रंथ न राहता, प्रत्यक्ष तयारीसाठीचा वापरण्याजोगा रोडमॅप ठरते.

या पुस्तकात २०२० ते २०१४ या पाच वर्षांतील एकूण ४०० प्रश्नांची सविस्तर, संरचित आणि मॉडेल उत्तरे दिली आहेत. ही उत्तरे UPSC धर्तीवर परिचय मुख्य भाग निष्कर्ष या चौकटीत मांडलेली असून, प्रत्येक उत्तर प्रश्नाच्या मागणीला अनुसरून विश्लेषणात्मक, बहुआयामी आणि संतुलित दृष्टिकोनातून सादर केलेले आहे. चालू घडामोडी, महत्त्वपूर्ण आकडेवारी, समिती अहवाल, घटनात्मक तरतुदी, योजना, नकाशे आणि समकालीन उदाहरणांचा प्रभावी वापर करून उत्तर अधिक विश्वासार्ह आणि गुणप्राप्तीक्षम कसे करता येते, यावर विशेष भर देण्यात आला आहे.

उमेदवारांनी प्रथम स्वतः उत्तर लिहावे, नंतर दिलेल्या मॉडेल उत्तराशी तुलना करावी, रचना, शब्दमर्यादा, मुद्देसूदपणा आणि सादरीकरण यांचे आत्मपरीक्षण करावे. वेळेचे व्यवस्थापन, मर्यादित शब्दांत नेमके लिहिणे आणि परीक्षेच्या दडपणाखालीही संतुलित उत्तर मांडणे हीच या पुस्तकामागील मूलभूत भूमिका आहे,

हे कार्य एका व्यक्तीचे नसून, सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या पुस्तकाच्या निर्मितीत आप्पा हातनुरे सर, साई डहाळे, आदिनाथ सुरनर, मधूश्री अकोलकर, आदित्य अकोलकर, आणि लोकसेवा अकॅडमीच्या संपूर्ण टीमचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या अनुभव, सातत्यपूर्ण पुनरावलोकन आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोनामुळे हे पुस्तक अधिक वास्तववादी, समृद्ध आणि उपयुक्त झाले आहे.

शेवटी, UPSC / MPSC मुख्य परीक्षा ही केवळ स्पर्धा नसून, ती जबाबदार लोकसेवेसाठीच्या मानसिकतेची तयारी आहे. संतुलित विचार, स्पष्ट अभिव्यक्ती, नैतिक अधिष्ठान, सार्वजनिक हिताची जाणीव आणि प्रभावी लेखनशैली हेच या परीक्षेतील खरे यश आहे. हे पुस्तक तुमच्या तयारीचा विश्वासार्ह साथीदार आणि मार्गदर्शक ठरेल, हीच अपेक्षा.

वाचा, लिहा, सराव करा आणि योग्य मार्गदर्शन इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

“Success comes to those who try.”

Available at Ksagar Book Centre Granth

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.