Lok Prashasan 2016-2025 Solved Papers UPSC-N.N. Ojha Chronicle
Lok Prashasan 2016-2025 Solved Papers UPSC-N.N. Ojha Chronicle Original price was: ₹375.00.Current price is: ₹300.00.
Back to products
MPSC Planner
MPSC Planner Original price was: ₹75.00.Current price is: ₹56.25.

Marathi Vyakaran 2000+MCQs- Aniket Patil Asha Publication

Original price was: ₹450.00.Current price is: ₹315.00.

Author          :     Aniket Patil

Edition         :      2026

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Asha Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Marathi Vyakaran 2000+MCQs- Aniket Patil Asha Publication

लेखक: अनिकेत पाटील मनोगत…

प्रिय मित्र / मैत्रिणींनी,

हे पुस्तक तुमच्या हातात देताना विशेष आनंद होत आहे, कारण आजपर्यंत सर्व पुस्तके मी अगोदर लिहिली नंतर मुलांना ती आवडली. मात्र “हे असे पहिले पुस्तक आहे जे विद्यार्थ्यांनी अगोदर मागितले आणि नंतर मी तयार केले.”

ما

खरं तर हे पुस्तक लिहिण्याचा माझा काही विचार नव्हता आणि माझ्या मनात असा विचार न येण्याचे कारण म्हणजे बाजारात मराठी व्याकरणाची अनेक दर्जेदार संदर्भ ग्रंथ आधीच उपलब्ध आहेत, मग उगाच आपल्या नावाचे पुस्तक असावे आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढवावा यासाठी पुस्तक लिहिण्याच्या अट्टहास करणे बरोबर नाही. योगायोगाने मला मुलगी झाली आणि विद्यार्थ्यांनी बेंचवर ऑफर मागण्यास सुरुवात केली. मी विचार केला की एवढा आनंदाचा क्षण आहे, १०% २०% ऑफरने काय होईल? म्हणून एक पूर्ण विषयच माझ्याकडून विद्यार्थ्यांना शिकवावा असा विचार केला व मराठी विषयाला आपल्या यूट्यूब चॅनेलवर शिकवायला सुरुवात केली. जेव्हा ३० अध्याय झाले तेव्हा विद्यार्थ्यांनी ही मागणी सुरू केली की तुमच्या पीडीएफ नोट्स झेरॉक्स करायला खूप खर्चीक आहे मग आम्हाला याचे पुस्तकात रूपांतर करून द्या.

मी विचार करत होती की आधीच चांगले पुस्तक असताना विद्यार्थी एवठी मागणी का करत आहेत? तेव्हा मला समजले की आपल्या नोट्समध्ये ४ गोष्टी ह्या वेगळ्या व अधिक आहेत. १) त्यात इतर पुस्तकांपेक्षा जास्त संदर्भ ग्रंधांचा वापर केलेला आहे व जास्त उदाहरणे दिली आहेत. २) त्यात प्रत्येक टॉपिक नंतर लगेच आयोगाचे प्रश्न दिले आहेत. ३) त्यात ठिकठिकाणी प्रश्न सोडवण्याच्या ट्रिक्स दिल्या आहेत. ४) सर्वात महत्वाचे म्हणजे नोट्स प्रिंट करण्यात जो खर्च येत होता, त्यापेक्षा किती तरी पटीने स्वस्तात हे पुस्तक तुम्हाला मिळेल.

मला सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी रास्त वाटली व मी हे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला, पण जेवढे काम वरवर सोपे वाटत होते, त्यापेक्षा खूप जास्त काम अजून करायचे बाकी होते. जे आता पर्यंत केले होते ते फक्त A tip of the iceberg होते. मग अजून ८ वी ते १२ वी इयत्ता व इतर दुर्मिळ संदर्भ ग्रंथांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि स्वतः पण प्रत्येक घटकाचे सूक्ष्म अतिसूक्ष्म स्तरावर विच्छेदन करण्यात लागली. जसे ‘समास’ हे प्रकरण बघितले तर त्यात नुसते त्यावरचे प्रश्न प्रकरणानंतर घेतले नाहीत तर ‘समासाचा उपप्रकार – तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष चतुर्थी विभक्ती तत्पुरुष’ इतके सखोल विच्छेदन करून त्या घटकाचे तिथेच प्रश्न दिलेत. म्हणजे एकदा हे पुस्तक वाचल्यावर मुलांना हे पण माहीत असेल की चतुर्थी तत्पुरुष समासावर ४ प्रश्न आलेत व तृतीया बहुव्रीही समासावर एकही प्रश्न आलेला नाही. याचा फायदा आपल्याला पेपरच्या अगोदर रिव्हिजन करताना होईल की परीक्षेच्या आदल्या रात्री कोणत्या टॉपिकची रिव्हिजन करायची आहे? जर एखादा टॉपिक फारच अवघड जात आहे तर पुढे लगेच बघायचे की त्यावर प्रश्न विचारला आहे का? जर नाही तर चिंता करत बसायची नाही. जर एखादा टॉपिक महत्त्वाचा आहे व ती समजला नाहीच तर आपले यूट्यूब चॅनेल उघडायचे आणि तो व्हिडिओ बघून घ्यायचा.

मी व माझ्या टीमने पुस्तक पूर्णपणे त्रुटिविरहित करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ही प्रथम आवृत्ती असल्यामुळे नजर चुकीने एखादी चूक असू शकते, तुम्हाला अशा काही चुका आढळल्यास कृपया खालील क्रमांकावर कळवावे. जेणेकरून आम्हाला त्या पुढच्या आवृत्तीत दुरुस्त करता येतील.

तुम्हाला पुढील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा

संपर्क : ९६९९५७८१०० / ७८४१०४२१११

अनिकेत आशाबाई पाटील

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 954556786 /02024453065

Additional information
Language

,

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.