Azim Premiji-Sandeep Khanna,Varun Sood Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna
₹450.00 Original price was: ₹450.00.₹360.00Current price is: ₹360.00.
Author : Varun Sood
Edition : 2025
Language : Marathi
ISBN : 9789391629724
Publisher : Krishna Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Azim Premiji-Sandeep Khanna,Varun Sood Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna
गे ल्या पाचहून अधिक दशकांपासून अझीम हाशम प्रेमजी हे एक गूढ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात आहेत. अत्यंत गोपनीय वैयक्तिक आयुष्य, मात्र तितकेच अत्यंत पारदर्शक व्यवहार असलेला एक सामर्थ्यशाली भांडवलदार अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याकडे सोन्यासारखं हृदय आहे, हे आपल्याला माहीत आहेच म्हणूनच त्यांची गणना जगातील सर्वोच्च परोपकारी व्यक्तींमध्ये होते. आपल्या पंचाहत्तर वर्षांच्या जुन्या कौटुंबिक व्यवसायाचं रूपांतर भारतातील अब्जावधी डॉलर्सच्या समूह-व्यवसायात करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी भारतातील सर्वाधिक यशस्वी सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एका कंपनीची उभारणी केली. त्यांच्याविषयीच्या कथनात याच एका वस्तुस्थितीचं प्राबल्य आहे.
त्यांनी केलेल्या परोपकारी कामांशिवायही प्रेमजी या माणसाच्या व्यक्तिमत्त्वात आणखीही खूप काही आहे. ज्या वेळी त्यांनी देणगी दिलेल्या पैशांच्या भरमसाट रकमेवर आपण नजर टाकतो त्या वेळी ‘परोपकारी व्यक्ती’ हा शब्दही त्यांच्या बाबतीत तोकडा असल्यासारखा वाटतो.
या पुस्तकात त्यांचं आयुष्य समाविष्ट करण्यासाठी आम्ही सन २०१९मध्ये बाहेर पडलो. अनिष चंडी या आमच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असलेल्या तज्ज्ञ एजंटाच्या सांगण्यावरून आम्ही हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त झालो होतो. ज्या वेळी गैरमार्गानं आपला पैसा देशाबाहेर पाठवून तो दुसरीकडे वळवल्याच्या किंवा विवाह आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमांवर उधळपट्टीनं खर्च करून श्रीमंतीचं सवंग प्रदर्शन केल्याच्या वृत्तकथा समोर येत होत्या, नेमक्या त्याच वेळी प्रेमजींच्या औदार्याची, परोपकाराची कथा आमच्या समोर आली आणि आमची जिज्ञासा चाळवली गेली. कामावर असताना वैयक्तिक कारणासाठी केलेल्या फोनचे पैसे आपल्या स्वतःच्या पाकिटातून देण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रेमजींच्या दृष्टीनं पैसा परदेशात ठेवणं किंवा डामडौलावर तो खर्च करून त्याचं प्रदर्शन करणं या गोष्टी विचारांच्या पलीकडच्या होत्या. इतक्या वर्षांच्या कालावधीत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीत त्यांनी कित्येक अब्ज रुपयांची भर घातली असली तरी त्यांच्या जीवनशैलीत किंचितसाही फरक पडलेला नाही. त्यांच्या एका ज्येष्ठ सहकारी अधिकाऱ्यानं सांगितलं की, श्रीमंतीमुळे त्यांच्या
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.