English Grammar Topic Wise PYQs Narayan Bidwe Vidyabharti
₹400.00 Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
Author : Narayan Bidwe
Edition : 2026
ISBN : 9788198477729
Language : Marathi
Publisher : Vidyabhartee Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
English Grammar Topic Wise PYQs Narayan Bidwe Vidyabharti
मनोगत
मित्रहो.
‘विद्याभारती Topic Wise PYQS ENGLISH GRAMMAR’ है 3000 पेक्षा जास्त PYQs सोडविलेले पुस्तक तुमच्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील MPSC व इतर स्पर्धा परीक्षांच्या 130 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न देताना त्यांचे विषयवार वर्गीकरण केलेले आहे. उ०. Parts of Speech वर आलेले प्रश्न Parts of Speech या Chapter मध्ये देण्यात आलेले आहेत तर Tenses वरील प्रश्न Tenses नावाच्या Chapter मध्ये देण्यात आलेले आहेत. यामुळे तुम्हाला परीक्षेतील प्रश्नांचा Chapter तुनुसार सराव करता येईल. Chapter मधील समजून घेतलेल्या संकल्पना पक्या होण्यासाठी त्यांचा सराव होण्याची गरज असते हे पुस्तक ही गरज पूर्ण करणार आहे. सोबतच, स्पर्धा परीक्षांमध्ये English Grammar व Vocabulary च्या कोणत्या घटकांवर कशाप्रकारे प्रश्न विचारण्यात येतात, हे देखील तुम्हाला येथे कळणार आहे.
वा शिवाय प्रत्येक Chapter च्या सुरुवातीला त्या Chapter मधील मुख्य संकल्पना थोडक्यात समजावून सांगितलेली आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आणि त्यापुढे मराठीतून सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
या पुस्तकात खालील प्रश्नपत्रिकांमधून प्रश्न घेतलेले आहेत. कंसात प्रश्नपत्रिकाची संख्या दिलेली आहे. PSI (12), STI (06), Assistant (02), ASO (06), PSI, STI, Assistant (Group B Exam) (17), Clerk-Typist (08), Tax Assistant, Technical Assistant (05), Secondary Inspector (01), Group C Exam (05), Departmental Exam: PSI (09), Departmental Exam: STI (03), Departmental Exam: ASO (09), Engineering Exams (09), Agricultural Services Exam (03), Forest Services Exam (04), State Service Exam (08), State Secret Service Exam (01), Translator Exam (01), D.Ed. CET/MAHA-TET Exam (11).
पुस्तकाच्या शेवटी सरावासाठी तीन प्रश्नपत्रिका व Group (C) मुख्य परीक्षा 2024 ची प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणांसहित देण्यात आलेल्या आहेत. या प्रश्नपत्रिका व पुस्तकातील प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये 4 ते 5 मुद्यांची माहिती दिलेली आहे, त्यामुळे एका प्रश्नातच तुमची 4 ते 5 प्रश्नांची तयारी होणार आहे.
उदा. सराव प्रश्नपत्रिकेत प्रश्न आहे
Q. Ravi has extreme fear of small confined place. Ravi has
Fill in the blank with proper word.
Answer Options:
(1) claustrophobia
(2) acrophobia
(3) pyrophobia
(4) agoraphobia
Ans (1), स्पष्टीकरण: Claustrophobia म्हणजे extreme fear of closed places, बंद जागेची भिती; agoraphobia म्हणजे fear of open place, उघड्या जागेची भिती; pyrophobia म्हणजे fear of fire, आगीची भिती; pyro म्हणजे आग.
या प्रश्नाच्या उत्तरात तुम्हाला चार शब्दांचे अर्थ तर माहीत झालेले आहेतच याशिवाय pyro म्हणजे आग या शब्दाचा अर्थ माहीत झाल्यामुळे pyromania या शब्दाचा अर्थ देखील तुम्हाला कळणार आहे.
मुद्देसूद माहिती व सोप्या भाषेत स्पष्टिकरण दिलेले असल्याने हे पुस्तक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांसोबतच
इंग्रजीच्या अभ्यासकांना देखील उपयोगी पडणार आहे.
डॉ. नारायण बिडवे
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.