Maratha Varchswache Badalate Aarutibandh Aani Maharashtrache Sattakaran-Vivek Ghotale The Unique
₹320.00 Original price was: ₹320.00.₹224.00Current price is: ₹224.00.
Author : Vivek Ghotale
Edition : 2 ed 2025
ISBN :
Language : Marathi
Publisher : The Unique Foundation
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Maratha Varchswache Badalate Aarutibandh Aani Maharashtrache Sattakaran-Vivek Ghotale The Unique
‘मराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकास या पुस्तकाची पहिली आवृत्ती १ जुलै २०२२ रोजी काढण्यात आली.
पुस्तकाचा औपचारिक प्रकाशन समारंभ झाला नसला तरी या पुस्तका वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. साधारणतः डिसेंबर २०२३ मा या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली.
दुसरी आवृत्ती निघतेय याचा मला काही विशेष आनंद वाटत नाही त्याचे कारण म्हणजे समकालीन सामाजिक तणाव, मराठा आरक्षणाच्च विशेषतः मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीह मराठा आणि ओबीसी या समाजांदरम्यान जो वाद-तणाव निर्मा झाला आहे, तो दुःखद असून तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही. दोन समाजघटकांना आपसात लढवत न ठेवता राज्याने आणि संघटनांन दोन्ही समाजांमध्ये संवाद-समन्वय घडवून आणून त्यांच्या हिताचे योग निर्णय घेण्याची वेळ आली आहे. असंख्य सामाजिक सुधारकांच्च योगदानातून बांधली गेलेली सामाजिक वीण, जातीय सलोखा आणि संवादाची परंपरा कायम राखत या दोन्ही समाजांतील परस्पर दैनंदि व्यवहार टिकविण्यासाठी सर्वच समाजघटकांनी प्रयत्न करण्याचा ह काळ आहे. आज पुन्हा एकदा ‘बहुजनवादी महाराष्ट्रा’ची, ‘महारा! धर्मा’ची आवश्यकता असून त्याच्या पुनर्बाधणीसाठी आज प्रत्येकाने खारीचा वाटा उचलणे गरजेचे वाटते.
या पुस्तकावर अनेक मान्यवरांच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर प्रतिक्रिय
आल्या. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून आणि फोनवर चर्चा केली. त्यापैकी प्रा. नितीन बिरमल, प्रा. प्रकाश पवार, प्रवीणदादा गायकवाड, डॉ. अभय दातार आणि नामदेव काटकर यांच्या प्रतिक्रिया प्रस्तावनेनंतर
समाविष्ट केल्या आहेत. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
काही मित्रमंडळींनी आणि काही अपरिचितांनी देखील पुस्तकाची प्रत परस्पर विकत घेऊन राज्यातील काही महत्त्वाच्या राजकीय नेतृत्वांना हे पुस्तक भेट देऊन वाचण्याची विनंती केली, यानिमित्ताने अनेकलिय क्षेत्रातील अपरिचित व्यक्ती मित्र म्हणून जोडल्या गेल्या, हे पुस्तक विकत घेऊन भेट प्रत देणाऱ्या सर्वच परिचितांचे अपरिचितांचे आभार
दै. सकाळ, दै. महाराष्ट्र टाईम्स, दै. लोकमत या वृत्तपत्रांमन्त्री समाज प्रबोधन पत्रिका, विचारशलाका, परिवर्तनाचा वाटसरू या नियतकालिकांमध्ये याशिवाय कर्तव्य साघना, द वायर (मराठी) या वेब पोर्टलवर या पुस्तकांचे परिचय प्रकाशित झाले, शिवाय काही मित्र, कार्यकर्ते, पत्रकारांनी आणि वेगवेगळ्या संघटनांच्या व्यक्तींनी पुस्तकांविषयीची माहिती व या पुस्तकाचे मुखपृष्ठ समाजमाध्यमांत शेअर केले. पुस्तक परिचय लिहिणाऱ्या सर्व लेखकांचे आणि तो प्रकाशित करणाऱ्या सर्व माध्यमांचे आभार.
प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी दै. लोकसत्ताच्या ‘लोकरंग’ या पुरवणीतील ‘चर्चेतील उत्तम नवे वाचनीय ग्रंथ उपक्रम यादीत’ या पुस्तकाचा समावेश केला, त्याबद्दल त्यांचे आभार.
प्रस्तुत पुस्तकाला यशवंतराव दाते स्मृती संस्थेचा ‘डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे वैचारिक ग्रंथ पुरस्कार, (वर्धा)’ (24 डिसेंबर 2022) प्राप्त झाला आहे. पीएच.डी. साठी केलेल्या आणि तेही सामाजिक शास्त्रातील संशोधनाला पुरस्कार मिळणे ही महत्त्वपूर्ण बाब ठरते. पुरस्कार देणारी संस्था आणि परीक्षक यांचेही मनःपूर्वक आभार मानती.
या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निर्मितीमध्ये ‘स्ट्रॅटेजी कॉर्पोरेशन’ या संस्थेचे सहकार्य लाभले. या संस्थेचे संचालक व संचालक मंडळ, पदाधिकारी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो आणि दुसऱ्या आवृत्तीस वाचकांचा चिकित्सक प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.
– विवेक घोटाळे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.