Akhand Savdhan Swatala Ghadavtana Spardha Pariksha Tayari Karnarya Vidhathino-Digambar Ingle The Unique
₹200.00 Original price was: ₹200.00.₹140.00Current price is: ₹140.00.
Author : Digambar Ingle
Edition : 1 ed 2025
ISBN : 9788198751157
Language : Marathi
Publisher : The Unique Foundation
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Akhand Savdhan Swatala Ghadavtana Spardha Pariksha Tayari Karnarya Vidhathino-Digambar Ingle The Unique
प्रास्ताविक
‘स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो.अखंड सावधान!’ हा ग्रंथ वाचकांग उपलब्ध करून देताना अत्यानंद होत आहे.
पदवी व पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करताना सोबतच यूपीएससी, एमपीएससीकी आणि सेट-नेटची तयारी सुरू असताना प्रथमच बी. एड. सीईटीच्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याच्या माध्यमातून व समुपदेशनास झालेली सुरुवात ते आजपर्यंतच्या वाटचालीत अनेक विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला. जसजमे ज्ञान आणि अनुभव वृद्धिंगत होत गेले. तसतशी समुपदेशनात पारंगतता आणण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांना विविध टप्प्यांवर सातत्याने मार्गदर्शनाची व समुपदेशनाची गरज असते. त्यांना योग्य वेळी जर समुपदेशन मिळाले तर विद्यार्थी वेळेत यशस्वी होतात. त्यांना जर काही बाबींची वेळीच जाणीव करून दिली तर ते अपेक्षित वेळी ध्येयस्थानी विराजमान होऊ शकतात, हा विश्वास सातत्याने वृद्धिंगत होत आहे.
शैक्षणिक व स्पर्धा परीक्षाविषयक समुपदेशनातून उलगडले गेलेले अनेक पैलू या ग्रंथातून शब्दबद्ध झाले आहेत. प्राप्त ज्ञान व अनुभव यांचे गाठोडे भावी पिढींकडे सुपुर्द करणे या उदात्त हेतूने विद्यार्थी व पालकांना अचूक दिशा देणारा हा ग्रंथ आकाराला आला.
पुणे येथील नामांकित अशा युनिक अॅकॅडमीमध्ये समुपदेशन करताना संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमधून शिक्षण व स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळणारे काही विद्यार्थी आणि त्यांचे पालक सातत्याने समुपदेशन घेण्यासाठी येत असतात.
पौंगडावस्थेमधील विद्यार्थी, पदवी व पदवीनंतरचे विद्यार्थी यांना योग्यवेळी योग्य मार्गदर्शन देणारं पुस्तक असावं अशी मनोमन इच्छा होती, ती या पुस्तकाने पूर्ण केली.
शिक्षणासाठी विविध ठिकाणांहून शहराकडे धाव घेणारे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांकडे वळणारे परीक्षार्थी, नोकरी वा व्यवसाय या निमित्ताने ओढले गेलेले तरुण-तरुणी यांची प्राथमिक, कौटुंबिक, मानसिक, आर्थिक, शैक्षणिक व वैचारिक स्थिती आणि
त्यांना शहरात येणाऱ्या प्राथमिक समस्या आणि येणारी आव्हाने यांबाबत सजग करणे आणि येणाऱ्या अडचणींवर मात करून ध्येयाकडे झेप कशी घ्यावी? ध्येय निश्चिती करताना घ्यावयाची काळजी, निर्णय व नियोजन यातील उणिवा व त्यावर वरील उपाययोजनांबाबत या ग्रंथात ऊहापोह करण्यात आला आहे. या पुस्तकात अनुभवाधारित दाखले व उदाहरणांद्वारे तसेच मुलाखर्तीद्वारे प्राप्त सार विश्लेषण पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. सहज व सोप्या पद्धतीने समजावे म्हणून आवश्यक त्या ठिकाणी आकृत्याच्या साहाय्याने स्पष्ट केले आहे.
या पुस्तकरूपाने स्पर्धा परीक्षा आणि इतर करिअर क्षेत्र यातील एकंदरीत परिस्थिती आणि त्यावर सकारात्मकरीत्या मांडलेला सर्वांगस्पर्शी उपाययोजनांचा हा अमृतकुंभम्हणजे ‘स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो… अखंड सावधान!’ हा ग्रंथ होय.
सर्व प्रश्न व आव्हानांवर अचूक व रामबाण उपाय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्यक्ष लेखकाला आलेले अनुभव, समाजाचा व विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि यावर अचूक मार्गदर्शनाची भूमिका यामध्ये चितारली आहे.
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरिता काही मूलभूत तत्त्वे व क्षमता आत्मसात कराव्या लागतात आणि त्या अंगी बाणवाव्या लागतात, याची जाणीव विद्यार्थी व पालक या दोघांनाही वेळीच होणे आवश्यक आहे, ही जाण करून न घेतल्याने विद्यार्थी, पालक व समाज यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि हे प्रश्न एकूणच व्यवस्थेला हाताळणे कठीण होत चालले आहेत.
‘स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो… अखंड सावधान!” या पुस्तकातून यशस्वी होण्याकरिता आवश्यक त्या क्षमता, सर्वसाधारण तत्त्वे याची जाणीव होऊन कृतिप्रवण होण्यास अचूक दिशा मिळेल. विद्यार्थी व पालक यांना शिक्षण क्षेत्र, स्पर्धा परीक्षा क्षेत्र, करिअर, उद्योग याबाबतचे समज व गैरसमज दूर होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षेची सद्यस्थिती आणि वास्तव याबाबत काही प्रश्न, आव्हाने, समस्या व त्यावरील मार्गदर्शन शृंखलेतील हे पुस्तक एक कडी आहे.
जोपर्यंत या पृथ्वीतलावर जिज्ञासू, महत्त्वाकांक्षी, स्वप्नाळू, जन्माला येत राहतील तोपर्यंत समुपदेशनाची ही शृंखला खंडित होता कामा नये. समुपदेशनाची ही शृंखला हे चक्र गतिमान करण्यासाठी कायम प्रसृत होत राहील.
दिगंबर इंगळे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.