Eka IAS Adhikaryachi Sangharshkatha-Ashok Khemka Marathi Book katha-kadambari (Novel) Krishna
₹399.00 Original price was: ₹399.00.₹319.00Current price is: ₹319.00.
Author : Ashok Khemka
Edition : 1 ed 2025
Language : Marathi
ISBN :
Publisher : Krishna Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Eka IAS Adhikaryachi Sangharshkatha-Ashok Khemka Marathi Book katha-kadambari (Novel) Krishna
२७ वर्षांची नोकरी आणि ५३ बदल्या :
याचा अर्थ नियुक्तीनंतर प्रत्येक ठिकाणाहून सरासरी सहा महिन्यांत बदली.
भारतीय नोकरशाहीतील एक व्यक्ती कायमच प्रवासात असते. तिचं नाव आहे, अशोक खेमका. सन २०१२मध्ये डीएलएफ हे रिअॅलिटी क्षेत्रातील बडं प्रस्थ आणि काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट बद्रा यांची कंपनी यांच्यातील व्यवहार रद्द केल्यामुळे हा आयएएस अधिकारी अचानकच प्रसिद्धीच्या झोतात आला. त्या वेळी काँग्रेस पक्ष सत्तेत होता, त्यामुळे बहुतेक लोकांनी याला आत्मघातकी निर्णय असं म्हटलं; परंतु अत्यंत प्रामाणिक अधिकारी अशा आपल्या तोपर्यंतच्या नावलौकिकाला साजेशा पद्धतीनंच खेमका या दबावासमोर बिलकूल झुकले नाहीत.
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत खेमकांनी तत्त्वहीन तडजोडी करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना राजकीय व्यक्तींकडून खूप त्रास सहन करावा लागला. मुख्यमंत्र्यांना विरोध केल्यामुळे त्यांची कार्यालयीन कार काढून घेण्यात आली. क्षुल्लक, पोरकट कारणांकरिता त्यांच्यावर आरोपपत्रं ठेवण्यात आली; पण अशा वैविध्यपूर्ण हितसंबंधी लोकांनी स्वार्थापोटी केलेल्या कारवायांमुळे हा खंबीर अधिकारी थोडासाही विचलित झाला नाही.
इथे अनेक प्रश्न निर्माण होतात. नेहमीच प्रवाहाबरोबर जाण्याचा कल असलेल्या ‘यंत्रणेसमोर’ (सिस्टिमसमोर) त्यांनी कधीही शरणागती का पत्करली नाही? निवडणुकांच्या वेळी आपल्या स्वार्थासाठी राजकीय पक्ष खेमकांचं उदाहरण देऊन त्यांचा उदो उदो का करतात आणि नंतर या माणसाला सोईस्करपणे का विसरून जातात ? त्यांची फक्त प्रशंसा करणारे लोक आहेत; पण ज्या वेळी केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्ती देण्याची वेळ येते, त्या वेळी त्यांच्या बाजूनं कोणीही का उभं नसतं ? त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशोक खेमका यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना कुठलीही राजवट असली तरी असेच त्रास भोगत राहावं लागणार आहे का?
हे पुस्तक भारताच्या प्रशासकीय यंत्रणेच्या अंतर्गत गोटातील धक्कादायक माहिती स्पष्टपणे उघड करतं. तिच्यातून खेमकांची कथा हे देशभरातील प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता एक स्फूर्तिदायक उदाहरण असल्याचं प्रकर्षानं समोर येतं.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.