Pakka Paya Scholarship Guide Class 7th – Bhag 2 Guide Va Sarav (English va budhimatta chachani) Uchch Prathamik Shishyavrutti Pariksha- Atul Bhoge,Ravindra More Marathi Madhyam book
₹300.00 Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00.
Author : Atul Bhoge,Ravindra More
Edition : 2026 ed
Language : MARATHI
Publisher : Pakka Paya Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Pakka Paya Scholarship Guide Class 7th – Bhag 2 Guide Va Sarav (English va budhimatta chachani) Uchch Prathamik Shishyavrutti Pariksha- Atul Bhoge,Ravindra More Marathi Madhyam book
मनीगत…
नमस्कार! सर्वांना…
इयत्ता सातवी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असे ‘पक्का पाया स्कॉलरशिप गाईड’ (क्लृप्त्या व सुत्रांसह) पेपर २ इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार संपूर्ण मार्गदर्शक व सराय पुस्तिका प्रकाशित करताना अतिशय आनंद होत आहे.
आठवी स्कॉलरशीप परीक्षेऐवजी राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गरिब, होतकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या वर्षी इयत्ता सातवीसाठी परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेची परिपूर्ण तयारी होण्यासाठी संकल्पना स्पष्ट करणाऱ्या मार्गदर्शिकची गरज लक्षात घेऊन एक उपयुक्त दर्जेदार मार्गदर्शिका आपल्या हाती देताना आम्हाला अत्यानंद होत आहे.
मार्गदर्शिका व सरावपुस्तिकेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे –
१) सहज सोपी, ओघवती भाषा यामुळे विद्यार्थी सहज मार्गदर्शिका सोडवू शकतात.
२) भारांशानुसार प्रश्नांची काठिण्य पातळी ३०% सोपे प्रश्न, ४०% मध्यम स्वरुपाचे व ३०% कठिण स्वरुपाचे परिक्षाभिमुख प्रश्न या मार्गदरिक्ति दिलेले आहेत.
३) मार्गदिश्र्शिकमध्ये विविध संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्ट करून दिलेल्या आहेत.
४) स्वाध्यायातील प्रश्न अतिशय दर्जेदार दिलेले आहेत.
५) इयत्ता सातवी स्कॉलरशिप परीक्षेची संपूर्ण तयारी होण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शिका आहे.
या मार्गदर्शिकतील प्रश्नांची काठिण्यपातळी इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना समजेल या प्रकारची ठेवण्यात आलेली आहे व संकल्पना स्पष्ट करण्यावर भर देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये उत्तम सुयश संपादन करण्यासाठी ‘पक्का पाया स्कॉलरशिप परीक्षा गाईड’ (क्लृप्त्या व सुत्रांसह) १००% उपयुक्त ठरेल व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी पात्र व गुणवत्ताधारक ठरण्यासाठी सदर मार्गदर्शिका उपयुक्त ठरेल, त्यामुळे आपण या मार्गदर्शिकिचा अवश्य वापर करावा असे आम्ही आव्हान करतो.
सदर मार्गदर्शिका अचूक व निर्दोष व्हावी यासाठी प्रयत्न केलेले आहेत, जरी नजरचुकीने किंवा प्रिटिंग दोष असेल तर जरूर कळवावे. आपल्या सूचना स्वागतार्हच राहतील.
इतर सर्व स्पर्धा परीक्षा गाईड, प्रश्नसंच या सर्व पुस्तकांप्रमाणेच या इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी पुस्तकाचे
स्वागत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
धन्यवाद !
श्री. अतुल भोगे। श्री. रविंद्र मोरे
(लेखक)
Available at Ksagar Book Centre or on www.
ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.